काल आलेल्या पोरांनी साहेबांना शिकवू नये, भुजबळांचे कार्यकर्ते रोहित पवारांवरच संतापले, राष्ट्रवादीत ठिणगी, मुद्दा काय?

माजी मंत्री आणि आमदार छगन भुजबळ यांनी सरस्वती देवीबद्दल वक्तव्य केल्यानंतर त्यांना रोहित पवारांनी सल्ला दिला होता. त्यावरून आता प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

काल आलेल्या पोरांनी साहेबांना शिकवू नये, भुजबळांचे कार्यकर्ते रोहित पवारांवरच संतापले, राष्ट्रवादीत ठिणगी, मुद्दा काय?
Follow us
| Updated on: Nov 29, 2022 | 4:09 PM

पुणेः राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ यांनी काल सरस्वतीदेवीने किती शाळा काढल्या असा सवाल उपस्थित केल्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटले. त्यानंतर छगन भुजबळ यांच्यावर विरोधकांसह पक्षातील आमदार रोहित पवार यांनीही त्यांच्यावर निशाणा साधत तुम्ही काळजीपूर्वक बोला असा सल्ला दिला. छगन भुजबळ यांच्या वक्तव्याने नाराजी झालेल्या राजकीय मंडळीनंतर आता रोहित पवारांनी छगन भुजबळांना सल्ला दिल्याने भुजबळ समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

त्यामुळे त्यांनी थेट पक्षासह आमदार रोहित पवार यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.रा

ष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या सरस्वतीच्या वक्तव्यानंतर विरोधकांसह पक्षातील नेत्यांनी त्यांना सुनावल्यानंतर आता छगन भुजबळ समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे.

त्यामुळे त्यांनी थेट, आम्ही पक्षाचे नाही, साहेबांचे समर्थक आहे अशा शब्दात राष्ट्रावादीला आणि रोहित पवार यांना सुनावण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकर्ती सपना माळी शिवणकर यांनी छगन भुजबळ यांना रोहित पवार यांनी तु्म्ही काळजीपूर्वक बोला असा सल्ला दिल्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आमदार रोहित पवारांचा निषेध व्यक्त केला आहे.

यावेळी त्यांनी सांगितले की, छगन भुजबळ हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे काल आलेल्या पोरांनी, तुम्ही काळजीपूर्वक बोला हे सांगणं चुकीचं असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. या वक्तव्यावरूनच आम्ही रोहित पवार यांना समज आणि विनंती करतोय असंही त्यांना सुनावण्यात आले आहे.

आमदार छगन भुजबळ काय चुकीचं बोलत असतील तर ते तुम्ही सिद्ध करा असा टोलाही रोहित पवार यांना त्यांनी लगावला आहे.

यावेळी सपना माळी शिवणकर यांनी त्यांना सांगितले की, स्वतःला तुम्ही पुरोगामी समजत असाल तर आधी अभ्यास करा असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

छगन भुजबळ हे महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा घेऊन त्यांनी समता परिषद घेतात. त्यामुळे त्यांनी मांडलेला विचार हा राष्ट्रावादी पक्षाच्या स्टेजवरून सांगितले नाही तर त्यांनी समता परिषदेतून आपले विचार व्यक्त केले आहेत असा जोरदार टोलाही सपना माळी शिवणकर यांनी त्यांना लगावला आहे.

छगन भुजबळ यांना तुम्ही जर विचारपूर्वक बोला अशा सूचना देत असालतर रोहित पवार तुम्ही फक्त निवडणुकीपुरतं विचार मांडता. त्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो असंही त्यांना यावेळी सांगितले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.