पुण्यातील आमदारांना रविवारी सुट्टी असते…बड्या नेत्याने का केले असे वक्तव्य
अजित पवार खूप प्रांजळ मनाचा माणूस आहे. अजित पवार कधीच चुकीच्या लोकांना पाठिशी घालणार नाहीत. अजितदादा धनंजय मुंडे यांच्याकडे तुमचे काय अडकले आहे? त्यांच्याकडून धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला जात नाही? जोपर्यंत संतोष देशमुख प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळ घेऊ नका.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगीचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास आणि आरोपींना कठोर शिक्षेच्या मागणीसाठी राज्यात मोर्चे काढले जात आहे. बीड, बुलढाणा, परभणीनंतर रविवारी पुणे शहरात मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी भाजप आमदार सुरेश धस यांनी जोरदार टोलेबाजी केली. या मोर्चात पुण्यातील आमदार आले नाही. त्यांनी मोर्चाकडे पाठ फिरवली. त्यामुळे पुण्यातील आमदारांना रविवारी सुट्टी असते. त्यामुळे त्यांना मोर्चात येण्यास वेळ मिळाले नसले, असा टोला सुरेश धस यांनी लगावला.
मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या पूर्ण केल्या
आमदार सुरेश धस म्हणाले, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बाबतीत न्याय झाला पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूर्यवंशी यांना दहा कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. संतोष देशमुख यांच्या बाबतीत ज्या मागण्या आम्ही केल्या त्या सगळ्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केल्या आहेत. या प्रकरणात ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांनी काम पाहावे, अशी विनंती मी केली आहे.
त्यांच्या पुण्यातील मालमत्तेची माहिती द्या
बीडमध्ये संघटीत टोळी निर्माण करण्याचे काम वालू बाबाने केले आहे. त्याला त्याचा आकाचा आशीर्वाद होता. ज्यांनी या लेकरा बाळांचे छत्र हरवून घेतले आहे तो आका असो किंवा आकांपेक्षा मोठा त्यांना फाशी झालीच पाहिजे, असे सुरेश धस यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले की, संतोष देशमुख प्रकरणात सगळे आरोपींना पुण्यात अटक झाली. वालुकाका अँड गँग गँग्स ऑफ परळी यांच्यामुळे पुण्याचे नाव खराब होईल. त्या गँगचे जिथे जिथे पुण्यात फ्लॅट्स असतील पुण्यातील जनतेला विनंती करतो यांची प्रॉपर्टी दिसेल फक्त आम्हाला कळवा.
सुरेश धस यांनी पुण्यातील संपत्ती घेण्याबाबत म्हटले, 25- 25 वर्ष झाले आम्ही राजकारणात आहोत. परंतु पुण्यात स्वत:च्या बळावर एकच फ्लॅट रडत पडत घेतला आहे. अजित पवार खूप प्रांजळ मनाचा माणूस आहे. अजित पवार कधीच चुकीच्या लोकांना पाठिशी घालणार नाहीत. अजितदादा धनंजय मुंडे यांच्याकडे तुमचे काय अडकले आहे? त्यांच्याकडून धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला जात नाही? जोपर्यंत संतोष देशमुख प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळ घेऊ नका. त्यांना सरकारच्या बाहेर ठेवा. त्यांचा राजीनामा घ्यायचा नसेल तर त्यांना बिन खात्याचा मंत्री करा.