Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसेने सात कार्यकर्त्यांवर केली कारवाई , ५० जणांनी दिले राजीनामे

रवींद्र धंगेकर यांच्या प्रचार मनसेचे काही जण करत होते. त्यातील रवींद्र खेडेकर, सागर पांगारे, गोपी घोरपडे, अनिल चांदांगे, रिझवान बागवान, प्रकाश ढमढेरे, नीलेश निकम यांची हकालपट्टी करण्यात आली होती.

मनसेने सात कार्यकर्त्यांवर केली कारवाई , ५० जणांनी दिले राजीनामे
raj thackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 2:57 PM

पुणे : कसबा मतदारसंघात पोटनिवडणुकीची रणधुमाळी आज संपणार आहे. या निवडणुकीत भाजप उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये होणार आहे. राज ठाकरे (Raj Thackeray)यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही काही कार्यकर्ते काँग्रेस उमेदवार रवींद्र घंगेकर यांचा प्रचार करत होते. त्यातील सात जणांवर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर सुमारे पन्नास जणांनी राजीनामे दिल्यामुळे कसब्यात मनसेला खिंडार पडले.

मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. त्यावेळी त्यांनी कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीला (MVA) मदत होणार नाही याची काळजी घ्या. जास्तीत जास्त भाजपला मतदान करण्यासाठी कामाला लागा, असे आदेश दिले होते. या निवडणुकीत मनसे उघडपणे प्रचारात उतरणार नाही, मात्र मनसेची १०० टक्के मदत भाजपला व्हायला हवी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

कोणावर झाली कारवाई

रवींद्र धंगेकर यांच्या प्रचार मनसेचे काही जण करत होते. त्यातील रवींद्र खेडेकर, सागर पांगारे, गोपी घोरपडे, अनिल चांदांगे, रिझवान बागवान, प्रकाश ढमढेरे, नीलेश निकम यांची हकालपट्टी करण्यात आली होती. मनसेच्या या कारवाईनंतर कसबा विधानसभा मतदारसंघातील चाळीस ते पन्नास जणांनी राजीनामे दिले. या सर्वांनी आपला राजीनामा पक्षाच्या शहराध्यक्षांकडे पाठवला आहे. कसब्यात मनसेला खिंडार पडल्याचे सांगितले जात आहे.

प्रचार संपणार, छुपा प्रचार राहणार

कसबा पेठ व पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार आज संपणार आहे. मतदान २६ फेब्रुवारी रोजी आहे. त्यामुळे दोन दिवस छुपा प्रचार व पडद्यामागील रणनिती आखण्यात जाणार आहे.

सट्टेबाज सक्रीय

सट्टेबाजांकडून निकालाबाबत अंदाज लावले जात आहेत. त्यासाठी होणाऱ्या प्रत्येक सभा, बैठक, रॅली याकडे सट्टेबाजांचे लक्ष ठेवले आहे. कोणाला किती प्रतिसाद मिळत आहे, त्यानुसार संबंधित उमेदवाराचा सट्टाबाजारातील ‘भाव’ ठरत आहे. जो उमेदवार विजयी होणार त्याला कमी भाव तर पराभूत होणाऱ्या उमेदवाराला जादा भाव सट्टेबाजांकडून दिला जातो.

प्रचारात सुरू झालेला हा सट्टा बाजार मतदानाचा दिवस व मतमोजणीच्या शेवटच्या क्षणापर्यंत तेजीत असतो. क्षणाक्षणाला अंदाज बदलत असतात. त्यानुसार सट्टाबाजारातील उलाढाल होत असते.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.