कॅरेम, सोंगट्या आणि…, राज ठाकरे यांच्याकडून तीन शब्दांत राजकीय परिस्थितीचं वर्णन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर मिश्किल शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच राज ठाकरे यांनी राज्याच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चिंता देखील व्यक्त केली. पण सध्या ज्या घडामोडी सुरु आहेत त्याची सुरुवात शरद पवार यांच्यापासूनच झाली होती, असं राज ठाकरे म्हणाले.

कॅरेम, सोंगट्या आणि..., राज ठाकरे यांच्याकडून तीन शब्दांत राजकीय परिस्थितीचं वर्णन
Follow us
| Updated on: Jul 04, 2023 | 6:28 PM

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्याच्या परिस्थितीत अनपेक्षित अशा घडामोडी बघायला मिळत आहेत. विरोधात असणारे नेते आता एकत्र आले आहेत. कालपर्यंत एकमेकांवर टीका करणारे, आरोप-प्रत्यारोप करणारे नेते हे आता एकत्र सरकारमध्ये सामील झाले आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदारांवर सडकून टीका केली होती. त्यांनी शिवसेनेच्या आमदारांना गद्दार म्हणून हिणवलं होतं. तसेच त्यांनी भाजपवरही सडकून टीका केली होती. एकमेकांविरोधात टोकाची टीका करणारे नेतेमंडळी एकत्र आल्याने संपूर्ण राज्यात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सध्याच्या या राजकीय परिस्थितीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत भाष्य केलं आहे.

‘शरद पवार यांच्याकडून सुरुवात’

“या सर्व गोष्टींची महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरुवात केली. त्यांनी जो पहिला पुलोदचा प्रयत्न केला त्यावेळी काय केलं? शरद पवार यांच्याकडून सुरुवात झाली. शेवट त्यांच्यापर्यंतच आला. पण मला तसं वाटत नाही.मला प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ ही माणसं अजित पवार यांच्याबरोबर जाण्यासारखी वाटत नाहीत. त्यामुळे ही तीन माणसं संशयास्पद वाटतात. अजित पवारांबरोबर जावून मंत्रिपद स्वीकारतील असं वाटत नाही”, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.

‘उद्या समजा सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झालेल्या दिसल्या तर…’

“अजित पवार यांनी परवा एक स्टेटमेंट केलं की, सर्व होर्डिंग्जवर शरद पवार यांचे फोटो लावा. हे सगळं अनाकलनीय आहे. त्यामुळे उद्या समजा सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झालेल्या दिसल्या तर मला त्याचं आश्चर्य वाटणार नाही. ही गोष्ट अचानक घडलीय, असं नाहीय. ही गोष्ट गेल्या अनेक दिवसांपासून चालू होती. गेले कित्येक दिवस वातावरणात चालू होती. काल ती दिसली”, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

‘कोणाच्या सोंगट्या कोणाच्या…’

“इतका चुकीचा कॅरेम फुटलाय ना कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात आहे ते कळत नाही. मला आसं वाटतं की, मी माझ्या लोकांना म्हटलो की, तुम्ही लोकंच आहात ज्यांना हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहेत म्हणून ओळखलं जातं. बाकी कुणाचा पत्ताच लागत नाही की कोण कोणत्या पक्षात आहे. महाराष्ट्राची दुर्देवी परिस्थिती आहे”, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली.

“सध्याच्या राजकीय घडामोडींवरुन प्रत्येक घरामध्ये तुम्हाला शिव्या ऐकायला मिळतील. मी अनेकदा भाषणामध्ये बोललो आहे. मी काही दिवसांत मेळावा घेणार आहे. त्यावेळी या विषयावर सविस्तर बोलू”, असं राज ठाकरे यांनी सुरुवातीला सांगितलं. “आता घड्याळने काटा काढला की काट्याने घड्याळ काढला ते मला माहिती नाही”, असंदेखील राज ठाकरे यावेळी म्हणाले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.