‘राज ठाकरे मुंबईतून मोठा निर्णय जाहीर करणार’, मनसेच्या गोटात नेमकं काय घडतंय?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुढच्या चार ते पाच दिवसात मुंबईतून नवा निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली आहे.

'राज ठाकरे मुंबईतून मोठा निर्णय जाहीर करणार', मनसेच्या गोटात नेमकं काय घडतंय?
Follow us
| Updated on: Apr 18, 2023 | 12:10 AM

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुढच्या चार ते पाच दिवसात मुंबईतून नवा निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली आहे. आजची बैठक नेमकी कशासाठी होती ते लवकरच समजेल, असंही बाबू वागस्कर म्हणाले आहेत. “चार ते पाच दिवसात राज ठाकरे मुंबईतून नवा निर्णय जाहीर करतील. आजची बैठक अचानक नेमकी कशासाठी होती ही लवकरच तुम्हाला कळेल. पण पक्ष बांधणीसाठी आज महत्त्वाची बैठक पार पडली. काही दिवसांनी तुम्हाला कळेल की बैठकीत काय ठरलं आणि नवीन काय होईल”, अशी माहिती बाबू वागस्कर यांनी दिली.

राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे ते आज पुण्यातील पक्ष कार्यालयात दाखल झाले. राज ठाकरे मुंबईवरुन निघून थेट पुण्यातील मनसेच्या पक्ष कार्यालयात दाखल झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. राज ठाकरेंनी लगेच पुणे शहरातील सगळ्या मुख्य पदाधिकाऱ्यांना बोलवून घेतलं. राज ठाकरे अचानक पुण्यात दाखल झाल्याने पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ उडाली. विशेष म्हणजे राज ठाकरे पुणे मनसे कार्यालयात असताना शहराचे अध्यक्ष साईनाथ बाबर आणि मनसे नेते बाबू वागस्कर हे पुणे महापालिकेत गेले होते.

हे सुद्धा वाचा

मनसे-भाजप एकत्र येणार?

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. सुप्रीम कोर्टात लवकरच राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याशिवाय दुसरीकडे भाजप आणि मनसेचीदेखील जवळ गेल्या काही दिवसांमध्ये वाढली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मनसे आणि भाजपची युती होईल का? याबाबत लवकरच स्पष्ट माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

अजित पवार खरंच भाजपसोबत जाणार?

राज्यात आगामी काळात महापालिका निवडणुका जाहीर होऊ शकतात. पण त्याआधी काय-काय राजकीय समीकरणं बघायला मिळतात ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला बघायला मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली, त्यानंतर भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात सत्तांतर घडवून आणलं. नंतर निवडणूक आयोगाने त्यांना पक्ष बहाल केला. पण सुप्रीम कोर्टाचा निकाल येणं अजून बाकी आहे. या निकालामुळे राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची चर्चा रंगू लागली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत भाजपला जाण्याची चर्चा आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.