‘जब हम दो साथ खडे, तो सबसे बडे’ मनसे नगरसेवक वसंत मोरेंचे ट्विट होतेय व्हायरल

पुणे पदवीधरच्या निवडणुकीतील पराभव हा पक्षाच्या नेत्यांनी 'मनसे' साथ दिली नसल्याने झाला असल्याची खंत त्या खासगी बोलून दाखवत होत्या. पक्ष सोडण्याच्या विचारापर्यंत आलेल्या रुपाली पाटील यांच्याकडील महिला शहराध्यक्षपदाची जबाबदारी काढून घेऊन प्रदेश उपाध्यक्षपद देऊन त्यांची बोळवण करण्यात आली.

जब हम दो साथ खडे, तो सबसे बडे मनसे नगरसेवक वसंत  मोरेंचे ट्विट होतेय व्हायरल
MNS Vasant more
| Edited By: | Updated on: Dec 15, 2021 | 11:44 AM

पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष रुपाली पाटील- ठोंबरे यांनी आपल्या सर्वपदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर महानगरपालिकेतील मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्या  ट्विटची सोशल मीडियावर चर्चा होतेय. वसंत मोरे यांनी ट्विटरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सोबत स्वतः व मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांच्या सोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर त्यांनी ‘जब हम दो साथ खडे तो सबसे बडे , अजून तात्या आणि साई भक्कम उभे आहेत’ असे म्हटले आहे. सद्यस्थितीला पुणे महानगरपालिकेत वसंत मोरे आणि साईनाथ बाबर हे दोघेच मनसेचे नगरसेवक आहेत. रुपाली पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी केलेलं हे ट्विट व्हायरल होत आहे .

पक्षातील काही नेत्यांनी ठरवून  काटा काढला

मागील काही दिवसांपूर्वी पक्षातील लोकच आपल्या विरोधात पक्ष नेतृत्वाचे कान भरत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यांच्यमुळे मला निर्णय घ्यावा लागेल असेही ठोंबरे म्हणाल्या होत्या. पुणे पदवीधरच्या निवडणुकीतील पराभव हा पक्षाच्या नेत्यांनी ‘मनसे’ साथ दिली नसल्याने झाला असल्याची खंत त्या खासगी बोलून दाखवत होत्या. पक्ष सोडण्याच्या विचारापर्यंत आलेल्या रुपाली पाटील यांच्याकडील महिला शहराध्यक्षपदाची जबाबदारी काढून घेऊन प्रदेश उपाध्यक्षपद देऊन त्यांची बोळवण करण्यात आली. मात्र, हे पद काढण्याआधी काही मिनिटेच कल्पना दिली होती. पक्षातील काही नेत्यांनी ठरवूनच काटा काढल्याचा आरोप रुपाली यांनी उघडपणे केला होता.

पक्षांतर्गत कलहामुळे  राजीनामा

रुपाली ठोंबरे यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहून आपला राजीनामा दिला आहे. मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे, असं रुपाली ठोंबरे यांनी स्पष्टपणे पत्रात लिहिलं आहे. तसेच आपले आशीर्वाद आणि “श्री.राज ठाकरे” हे नाव ह्रदयात कोरलेले कायम राहिल’ अशी भावना त्यांनी या राजीनामा पत्रात व्यक्त केली आहे.

Pune | काही महिन्यांपूर्वी जर स्वप्नीलचे यादीत नाव असते तर तो आज आमच्यात असता, वडिलांची प्रतिक्रिया

Raj Thackeray: अमरावतीसारख्या दंगली घडल्या तर सोडायचं नाही!! औरंगाबादेत राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश

Bacchu Kadu | ओमिक्रॉन एवढा प्रभावी आणि परिणामकारक ठरेल असं वाटत नाही : राज्यमंत्री बच्चू कडू