VIDEO | राज ठाकरेंच्या भाषणाची नवी सुरुवात, “अर्ध्या झाकलेल्या अन् अर्ध्या उघड्या असलेल्या चेहऱ्याच्या माझ्या बांधवांनो”

बाबासाहेब पुरंदरेंच्या जन्मशताब्दी सोहळ्यात व्यासपीठावर बहुतांश मान्यवरांनी मास्क घातला नव्हता. मात्र मास्कधारी प्रेक्षकांना संबोधताना राज ठाकरेंनी "अर्ध्या झाकलेल्या अन् अर्ध्या उघड्या असलेल्या चेहऱ्याच्या माझ्या बांधवांनो" अशी मार्मिक सुरुवात केली.

VIDEO | राज ठाकरेंच्या भाषणाची नवी सुरुवात, अर्ध्या झाकलेल्या अन् अर्ध्या उघड्या असलेल्या चेहऱ्याच्या माझ्या बांधवांनो
Raj Thackeray
Follow us
| Updated on: Aug 14, 2021 | 2:06 PM

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त पुण्यात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याला चिरतरुण आवाजाच्या गायिका आशा भोसले (Asha Bhosle) , मनसे अध्यक्ष राज ठाकरे  (Raj Thackeray) भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar),  महापौर मुरलीधर मोहोळ यासारख्या मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळी “अर्ध्या झाकलेल्या अन् अर्ध्या उघड्या असलेल्या चेहऱ्याच्या माझ्या बांधवांनो” अशा अनोख्या शैलीत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली आणि एकच हशा पिकला.

राज ठाकरे विनामास्क

व्यासपीठावरुन उपस्थितांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी मास्क लावला नव्हता. खरं तर गेल्याच महिन्यात राजकीय दौऱ्यावर असताना राज ठाकरे पुण्यात बाबासाहेब पुरंदरेंच्याही भेटीला गेले होते. संपूर्ण दौऱ्यात विनामास्क दिसलेले राज ठाकरे बाबासाहेबांच्या भेटीवेळी मात्र मास्क घालून होते. त्यामुळे राज ठाकरेंनी पहिल्यांदाच घातलेल्या मास्कच्या चर्चाही रंगल्या होत्या. परंतु आजच्या जन्मशताब्दी सोहळ्यात व्यासपीठावर बहुतांश मान्यवरांनी मास्क घातला नव्हता. मात्र मास्कधारी प्रेक्षकांना संबोधताना राज ठाकरेंनी “अर्ध्या झाकलेल्या अन् अर्ध्या उघड्या असलेल्या चेहऱ्याच्या माझ्या बांधवांनो” अशी मार्मिक सुरुवात केली.

राज ठाकरे काय म्हणाले?

“सहा वर्षांचा असताना मी पहिल्यांदा बाबासाहेब पुरंदरे या व्यक्तीला पाहिलं. त्याच्यानंतर कित्येक वर्षे मी त्यांना फक्त पाहत होतो, वाचत होतो. आता मला त्यांच्या सहवास लाभला. बाबासाहेब इतिहास जरी सांगत असले तरी ते वर्तमानात भानावर यायला शिकवतात, इतिहासात ज्या चुका केल्या, त्या वर्तमानात करू नये हे सांगतात. इतिहासाबरोबर वर्तमानाची जाग आणणार इतिहास बाबासाहेब सांगतात” अशा शब्दात राज ठाकरेंनी बाबासाहेबांच्या व्यक्तित्वाचे कंगोरे उलगडले.

“बाबासाहेबांची इतिहास सांगायची एक पद्धत आहे. ते तुम्हाला समजेल, रुचेल अश्या पद्धतीने इतिहास सांगतात. दंतकथांना त्यांच्या लिखाणात वाव नाही. शिवचरित्र अनेकांनी लिहिलं, पण बाबासाहेबांनी ते घराघरात, मनामनात पोहोचवलं. बाबासाहेब तुम्ही असाच इतिहास सांगत रहा, आमची नातवंड, पतवंड तुमच्याकडून असाच इतिहास ऐकत राहतील” अशा भावना व्यक्त करत, मोजक्या शब्दात राज ठाकरेंनी भाषण आटोपतं घेतलं.

आशाताईंचंही कौतुक

राज ठाकरे म्हणाले, कोण म्हणेल आशाताई 88 वर्षांच्या आहेत…. या वयातही काय दिसतात ना… अशी चर्चा आता लोकांमध्ये सुरु होती… मी म्हटलं आपण जाहीरपणे सांगावं, असं मिश्किलपणे राज ठाकरे म्हणाले. बाबासाहेब पुरंदरे, आशाताई इथे मंचावर बसलेत… आपण फक्त यांच्या वयाचे आकडे मोजायचे…याच्यापलीकडे आपल्या हातात काही नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

VIDEO | अहो आश्चर्यम! बाबासाहेब पुरंदरेंच्या भेटीत राज ठाकरे चक्क मास्कमध्ये

Video : ‘या वयातही आशाताई काय दिसतात ना!’, राज ठाकरेंकडून सौंदर्याचं कौतुक

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.