AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: हजारो लोकांसमोर आयुष्यात पहिल्यांदाच भाषण दिलं, नंतर काय घडलं?; राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी

आयुष्यात पहिल्यांदाच मी भाषण दिलं. हजारो लोकांसमोर भाषण दिलं. खरंतर काहीही तयारी नसताना मला जबरदस्तीने भाषण करायला शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी भाग पाडलं. (mns leader raj thackeray remembers his first speech at pune program)

VIDEO: हजारो लोकांसमोर आयुष्यात पहिल्यांदाच भाषण दिलं, नंतर काय घडलं?; राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
राज ठाकरे
Follow us
| Updated on: Sep 04, 2021 | 2:59 PM

पुणे: आयुष्यात पहिल्यांदाच मी भाषण दिलं. हजारो लोकांसमोर भाषण दिलं. खरंतर काहीही तयारी नसताना मला जबरदस्तीने भाषण करायला शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी भाग पाडलं. मी भाषण दिलं. त्यानंतर घरी आल्यावर मी पहिल्यांदा लेहंगा चेक केला, असं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्या भाषणाच्या आठवणी जागवल्या. (mns leader raj thackeray remembers his first speech at pune program)

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाची शंभर वर्षे पूर्ण केली आहेत. त्यानिमित्ताने वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. राज ठाकरे यांच्या हस्ते या बक्षीस वितरणाचा सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातील पहिल्या भाषणाचा किस्सा ऐकवला.

दसरा मेळावा होता. मी शिवाजी पार्कवर स्टेजवर बसलो होतो. माझ्या बाजूला बाळासाहेब बसले होते. त्यावेळचे सर्व नेते बसलेले होते. तेव्हा माननिय बाळासाहेबांनी विचारलं, तू बलोणार आहेस का? आमचा बाळासाहेबांशी अरेतुरेचा संवाद चालायचा. मी म्हणालो, काही तरी बोलू नकोस हं नाही तर मी व्यासपीठावरून निघून जाईल. त्यावर बाळासाहेब म्हणाले, नाही नाही.. तुला आज बोललं पाहिजे. मी म्हटलं, मी म्हटलं मी आताच्या आता निघून जाईन व्यासपीठावरनं. हे सर्व माझं घाबरून सुरू होतं. त्यानंतर कुणाचं तरी भाषण सुरू असताना दोन मिनिटाने मला बोलले तू बोलतोस की मी जाऊन जाहीर करू. त्यानंतर मी स्टेजवर हजारो लोकांसमोर उभा राहिलो. भाषण दिलं. माझ्या आयुष्यातील हे पहिलंच भाषण होतं. घरी आल्यावर मात्र मी पहिल्यांदा माझा लेहंगा चेक केला. तोपर्यंत माझी हिंमतच नव्हती बोलायची, असं राज म्हणाले.

विद्यार्थीदशेत बोलायची भीती वाटायची

या पहिल्या भाषणापर्यंत माझ्यात भाषण करण्याची हिंमत नव्हती. एवढ्या हजारो लोकांसमोर कधी बोलेल असं वाटलं नव्हतं. पण मला आज या चिमुकल्यांचा हेवा वाटतो. मला शालेय जीवनात बोलण्याची भीती वाटायची आणि जे बोलतात त्यांचं नेहमी कुतुहूल वाटायचं. वक्तृत्व स्पर्धेतून वक्ते तयार होणं महत्वाचं आहे, असं सांगतानाच मी कधी तरी वकृत्त्वावर बोलेन. आज सर्वच विषयावर बोलता येत नाही, असं त्यांनी सांगितलं.

वाजपेयी, जॉर्जही ऐकले

माझ्या आयुष्यात मी अनेक वक्ते ऐकले आहेत. घरात बाळासाहेब होते. शिवाय अटलबिहारी वाजपेयी, जॉज फर्नांडिस हे सर्व वक्ते मी ऐकले आहेत. त्यांना ऐकायला मिळालं हे मी माझं भाग्यचं समजतो, असंही ते म्हणाले.

राज यांनी केलं चिमुरडीचं कौतुक

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या 100व्या वाढदिवसानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत एका 5 वर्षाच्या चिमुरडीने सहभाग घेतला होता. ठाण्याहुन आलेली मुद्रा दामले या चिमुरडीच्या भाषणाने राज ठाकरे यांचेही मन जिंकले. राज यांनी आपल्या भाषणा दरम्यान मुद्राला चिमणी म्हणून हाक मारत स्टेजवर बोलवून तिचे कौतुक केले. शिवाय राज यांच्यासोबत मुद्राने फोटो काढला. (mns leader raj thackeray remembers his first speech at pune program)

संबंधित बातम्या:

राष्ट्रवादीच्या महिला आघाडीकडून पंतप्रधानांना शेणाच्या गोवऱ्या भेट; चाकणकरांच्या नेतृत्वात राज्यभरात आंदोलन

आम्ही समोरून कोथळा काढतो, पाठीत खंजीर खुपसत नाही; राऊतांचा चंद्रकांतदादांवर पलटवार

ज्यांचा मुख्यमंत्री, त्यांचं सरकार, आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वर, NCP च्या बालेकिल्ल्यात संजय राऊतांची डरकाळी

(mns leader raj thackeray remembers his first speech at pune program)