Rupali Patil | मनसेला अलविदा, राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा, डॅशिंग नेत्या रुपाली पाटील आता शिवसेना नेत्यांच्या भेटीला

रुपाली पाटील यांनी मनसेतील सर्व पदांचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. मनसे नेते अनिल शिदोरे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा दिल्याची माहिती आहे.

Rupali Patil | मनसेला अलविदा, राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा, डॅशिंग नेत्या रुपाली पाटील आता शिवसेना नेत्यांच्या भेटीला
रुपाली पाटील ठोंबरेंचा मनसेला रामराम
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 9:53 AM

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना पुणे दौऱ्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) डॅशिंग नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil) यांनी मनसेला ‘रामराम’ केला. रुपाली पाटील राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती बांधण्याच्या चर्चा असताना त्यांनी शिवसेना नेत्यांची भेट घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रुपाली पाटलांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांची भेट घेतली.

रुपाली पाटील यांचा राजीनामा

रुपाली पाटील यांनी मनसेतील सर्व पदांचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. मनसे नेते अनिल शिदोरे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा दिल्याची माहिती आहे. त्यांच्याकडे मनसेच्या महिला प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गत वादामुळे त्या नाराज होत्या. त्यामुळे पाटील मनसेला रामराम ठोकतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती.

शिवसेना नेत्यांशी भेट

युवासेनेच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. ‘आज मुंबई येथे सौ. रुपाली पाटील ठोंबरे यांनी महिलांचे विविध प्रश्न घेऊन युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी शिवसेना सचिव सुरज चव्हाण देखील उपस्थित होते.’ अशी माहिती देण्यात आली आहे. मात्र या भेटीचं नेमकं कारण काय, अशी चर्चाही रंगली आहे.

रुपाली पाटील या मनसेच्या डॅशिंग नेत्या म्हणून ओळखल्या जात. पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याने मनसेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर येत असताना रुपाली पाटील यांनी राजीनामा दिला आहे.

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांची टीका

राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

मनसेच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर रुपाली पाटील या आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याशी त्यांची चर्चा झाली. जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या शुक्रवारी रुपाली पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची चिन्हं आहेत. मात्र त्याबाबत अद्याप खात्रीलायक माहिती मिळालेली नाही.

संबंधित बातम्या :

रुपाली पाटील यांचा मनसेला अखेर ‘जय महाराष्ट्र’! अजित पवारांच्या उपस्थितीत हाती घड्याळ बांधणार

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.