वसंत मोरे यांचा संयमाचा बांध फुटला, डोळ्यांमध्ये अश्रू, भावनांचा कडेलोड, म्हणाले, ‘माझी तडफड…’

वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला असल्याचं जाहीर केलं. यावेळी वसंत मोरे यांचा संयमाचा बांध फुटला. वसंत मोरे यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले.

वसंत मोरे यांचा संयमाचा बांध फुटला, डोळ्यांमध्ये अश्रू, भावनांचा कडेलोड, म्हणाले, 'माझी तडफड...'
Follow us
| Updated on: Mar 12, 2024 | 3:06 PM

पुणे | 12 मार्च 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील बडे नेते वसंत मोरे यांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. वसंत मोरे यांनी आज फेसबुकवर एक पोस्ट टाकून खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपण मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला असल्याचं वसंत मोरे यांनी जाहीर केलं. यावेळी वसंत मोरे यांचा संयमाचा बांध फुटला. वसंत मोरे यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले. वसंत मोरे माध्यमांसमोर गऱ्हाणे मांडू लागले. पुणे शहरातील पक्षातील नेत्यांच्या वागणुकीमुळे आपण पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचं वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे पक्षाच्या वरिष्ठांकडे सु्द्धा याबाबत तक्रार करुनही आपली दखल घेतली गेली नाही, याचं शल्य आपल्या मनात टोचत असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं. वसंत मोरे यांचा चेहरा यावेळी अनेक प्रश्नांचं उत्तर देताना दिसला. पुण्यातला मनसेचा वाघ अशी ख्याती असलेला नेता आज भावूक झालेला बघायला मिळाला. या नेत्याने आज मनसेला सोडचिठ्ठी दिलीय. मनसे पक्षासाठी हा मोठा झटका आहे.

‘मी सगळ्या पदांचा राजीनामा दिला’

“मी सरुवातीच्या काळात शिवसेनेत राज ठाकरे यांच्यासोबत काम केलं. पुणे शहरातील शिवसेनेचा पहिला कार्यकर्ता ज्याने राज ठाकरे यांनी शिवसेनेचा राजीनामा दिल्या त्यावेळी मी सुद्धा विधानसभा मतदारसंघाचा उपविभाग अध्यक्ष होतो. त्यावेळेस शिवसेनेचा राजीनामा दिला. मी माझं स्वत:चं राजकीय करिअर राज ठाकरे यांच्यासोबत आहे. मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यत्वाचा आणि माझ्याकडे ज्या काही जबाबदाऱ्या आहेत, या सगळ्या पदांचा राजीनामा दिला आहे. कारण गेल्या वर्ष- दीड वर्षांपासून मी पुणे शहरात लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. माझ्यावर वारंवार, माझ्या शहरातीलच काही पदाधिकारी, जे स्वत: इच्छुक नव्हते, पण निवडणुका प्रत्यक्ष जवळ आल्या त्यावेळेस इच्छुकांची यादी वाढत गेली”, असं वसंत मोरे म्हणाले.

‘अखेर माझा कडेलोट झाला’

“मागच्या महिन्यात राज ठाकरे यांनी सर्व लोकसभा मतदारसंघाचे अहवाल मागितले होते. त्यामध्ये ज्या लोकांवर पुणे शहराच्या जबाबदाऱ्या होत्या त्या लोकांनी जो अहवाल तयार केला, पुणे शहरात मनसेची परिस्थिती अतिशय नाजूक आहे, असं जाणुनबुजून राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचल्या. एक निगेटिव्ह अहवाल पुढे पाठवला. तेव्हापासून पुणे शहरात मनसे पक्ष लोकसभेची निवडणूक लढवू शकत नाही, असे अहवाल गेले, या सर्वांचा वारंवार मला एकट्याला, मी एकनिष्ठ आहे, वेळोवेळी माझ्यावर अन्याय होतो. अखेर माझा कडेलोट झाला”, अशी भावना वसंत मोरे यांनी व्यक्त केली.

‘मी माझ्या स्वत:च्या हातांनी परतीचे दोर कापले’

“ज्या शहरांमध्ये ज्या लोकांबरोबर माझ्या राजकीय जीवनातील 15 वर्ष घालवली, पण हेच पदाधिकारी वसंत मोरेला तिकीट मिळायला नको, पक्ष संघटनेने निवडणूक लढवायला नको असे निगेटीव्ह अहवाल राज ठाकरे यांच्यापर्यंत पाठवत असतील तर मला वाटतं अशा लोकांपर्यंत काम करणं मला जमणार नाही. त्यामुळे मी माझ्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. मी माझ्या स्वत:च्या हातांनी परतीचे दोर कापले आहेत”, असं वसंत मोरे म्हणाले.

‘माझ्यासोबत असणाऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न’

“संघटनेच्या अनेक लोकांचे फोन आले. मी सामान्य कार्यकर्त्यांचे फोन घेतले. पण मी कोणत्याही नेत्याचा फोन घेतला नाही. कारण मी या सगळ्या गोष्टी वारंवार नेत्यांपर्यंत पोहोचवल्या. पण नेत्यांना या गोष्टी का कळत नाहीयत? तुम्ही आता का मला फोन करताय? माझी तडफड एवढ्या दिवसांत तुम्हाला कळली नाही का? वसंत मोरे स्वत:साठी कधीच लढला नाही. सामान्य पदाधिकाऱ्यांसोबत रडत आला आहे. जी लोकं माझ्यासोबत काम करत आहेत त्यांना दाबण्याचा प्रयत्न होतो”, असा आरोप वसंत मोरे यांनी केला.

“माझ्या माणसांवर चुकीच्या कारवाई होत असतील, त्यांच्याबरोबर राहून काय करायचं आहे? मी त्यासाठी राज ठाकरे यांच्याकडेही वेळ मागितली होती. पण राज ठाकरे सुद्धा मला बोलले नाहीत. मला वाटतं अशा पद्धतीने पुणे शहरात राजकारण होणार असेल तर अशा लोकांमध्ये न राहिलेलं बरं. माझा वाद आजपर्यंत राज ठाकरे आणि मनसे सोबत नव्हता. पण ज्या चुकीच्या लोकांच्या हातात पुणे शहरात पक्ष दिला, मी काल रात्रभर झोपलो नाही. पण इतकं सर्व कुणी मला काल का विचारलं नाही? मला आज का फोन करत आहात? निवडणूक लढवणं हा माझा गुन्हा आहे का? पक्ष संघटना वाढवण्यासाठी निवडणूक लढवली पाहिजे”, असं वसंत मोरे म्हणाले.

Non Stop LIVE Update
सदा सरवणकर माहिममधून उमेदवारी अर्ज मागे घेणार? शिंदेंकडून अल्टिमेमट
सदा सरवणकर माहिममधून उमेदवारी अर्ज मागे घेणार? शिंदेंकडून अल्टिमेमट.
'ईदचं लायटिंग,हिरवे कंदिल लागले असते, तर...', मनसेचा उबाठाला थेट सवाल
'ईदचं लायटिंग,हिरवे कंदिल लागले असते, तर...', मनसेचा उबाठाला थेट सवाल.
महायुतीचं सरकार येणार अन् मोठं पद मिळणार, अजितदादा नेमकं काय म्हणाले?
महायुतीचं सरकार येणार अन् मोठं पद मिळणार, अजितदादा नेमकं काय म्हणाले?.
माल संबोधल्याने एनसी यांचा राग अनावर, उबाठाच्या खासदाराला धरलं धारेवर
माल संबोधल्याने एनसी यांचा राग अनावर, उबाठाच्या खासदाराला धरलं धारेवर.
'कोणाचा दबाव?', राऊतांनी राज ठाकरेंना डिवचलं तर फडणवीसांनी मानले आभार
'कोणाचा दबाव?', राऊतांनी राज ठाकरेंना डिवचलं तर फडणवीसांनी मानले आभार.
दिवाळीत राजकीय 'फटाके', 23 तारखेला कोणाचा बॉम्ब फुटणार? नेत्यांचे दावे
दिवाळीत राजकीय 'फटाके', 23 तारखेला कोणाचा बॉम्ब फुटणार? नेत्यांचे दावे.
जरांगेंच्या M फॅक्टरमुळं कोणाची पडणार विकेट? विधानसभेसाठी समीकरण ठरलं
जरांगेंच्या M फॅक्टरमुळं कोणाची पडणार विकेट? विधानसभेसाठी समीकरण ठरलं.
'जनतेने निवडून दिल म्हणून लोकांना काठी हातात घेऊन माणस हाकलण्याची वेळ'
'जनतेने निवडून दिल म्हणून लोकांना काठी हातात घेऊन माणस हाकलण्याची वेळ'.
प्रकाश आंबेडकर पुण्यातील रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर मात्र...
प्रकाश आंबेडकर पुण्यातील रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर मात्र....
ऐन दिवाळीत राजकीय फटाके... सत्ताधारी-विरोधकांचे दावे काय?; बघा व्हिडीओ
ऐन दिवाळीत राजकीय फटाके... सत्ताधारी-विरोधकांचे दावे काय?; बघा व्हिडीओ.