राजकारणातील मोठी बातमी, मनसे नेते वसंत मोरे यांनी घेतली शरद पवार यांची भेट, काय झाली चर्चा

MNS leader Vasant More | गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे मनसेत नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी वसंत मोरे यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख नेते शरद पवार यांची भेट घेतली. पुणे येथील निसर्ग मंगल कार्यालयात वसंत मोरे यांनी शरद पवार यांची भेट झाली.

राजकारणातील मोठी बातमी, मनसे नेते वसंत मोरे यांनी घेतली शरद पवार यांची भेट, काय झाली चर्चा
Follow us
| Updated on: Feb 28, 2024 | 7:07 AM

प्रदीप कापसे, पुणे, दि. 27 फेब्रुवारी 2024 | पुणे लोकसभेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुणे लोकसभेची तयारी जोरात सुरु आहे. मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पुणे लोकसभेची जबाबदारी दिली आहे. यामुळे अमित ठाकरे यांचे पुणे दौरे वाढले आहेत. मनसेतून वसंत मोरे आणि साईनाथ बाबर या दोघांनी उघडपणे आपली लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच नुकतेच राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी या निवडणुसंदर्भात संकेत दिले होते. त्यांनी म्हटले होते की, साईनाथ बाबर यांना मला वरच्या पदावर पहायचं आहे. त्यांना आता महापालिकेत पाठवायचे नाही. त्यांना दिल्लीत पाठवले तर दुधात साखर पडेल. यामुळे मनसेत साईनाथ बाबर यांचा दावा मजबूत झाला आहे.

वसंत मोरे नाराज

गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे मनसेत नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी वसंत मोरे यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख नेते शरद पवार यांची भेट घेतली. पुणे येथील निसर्ग मंगल कार्यालयात वसंत मोरे यांनी शरद पवार यांची भेट झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यामुळे नाराज असलेले वसंत मोरे राष्ट्रवादी शरद पवार गटात जाणार की काय? अशी चर्चा सुरु झाली आहे.

भेटीनंतर काय म्हणाले वसंत मोरे

बारामती लोकसभा मतदार संघासोबत चर्चा सुरु असताना मनसे नेते सरळ शरद पवार यांना जाऊन भेटले. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर वसंत मोरे यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला. यावेळी ही राजकीय भेट नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले. आपण नाराज असल्याच्या बातम्या माध्यमांमधून येत आहेत.

हे सुद्धा वाचा

परंतु माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला कुठे नाराजी दिसत आहेत का? मी शरद पवार यांच्या भेटीसाठी मतदार संघातील कामासाठी आलो होतो. माझ्या खडकवासला मतदार संघाचा प्रश्न होता. हा विधानसभा मतदार संघ बारामती लोकसभा मतदार संघात येतो. या ठिकाणी नऊ एकर आरक्षणाचा एक प्लॉट आहे. त्याबाबत माझ्या संघटनेचे पत्र देण्यासाठी आला होतो. बारामती लोकसभेच्या सुप्रिया सुळे खासदार आहेत. यामुळे ही भेट झाल्याचे मोरे यांनी सांगितले.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.