Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुढच्या वर्षी माऊलींच्या दर्शनाला येताना पुण्याचा खासदार म्हणून…वसंत मोरे यांनी व्यक्त केली इच्छा

Pune Lok Shaba : पुणे लोकसभा पोटनिवडणूक अजून जाहीर झालेली नाही. परंतु विविध पक्षांनी आपआपला दावा दाखल केला आहे. भावी खासदार म्हणून बॅनरबाजी सुरु आहे. आता यामध्ये मनसेची भर पडली आहे.

पुढच्या वर्षी माऊलींच्या दर्शनाला येताना पुण्याचा खासदार म्हणून...वसंत मोरे यांनी व्यक्त केली इच्छा
Vasant More
Follow us
| Updated on: Jun 15, 2023 | 2:34 PM

पुणे : भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुण्यात लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे. या रिक्त जागेवर आता कधीही पोटनिवडणूक जाहीर होणार आहे. यासंदर्भात प्रशासनाकडूनही तयारी झाली आहे. पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या जागेवर इच्छुकांनी दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीत यासाठी स्पर्धा लागली आहे. आता मनसे नेते वसंत मोरे यांनी पुणे लोकसभेच्या जागावर आपला दावा केला. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा फलकांमध्ये वसंत मोरे यांचा उल्लेख भावी खासदार म्हणून केला आहे. त्यानंतर आज त्यांनी आपली महत्वकांक्षा बोलून दाखवली.

काय मागितले माऊलींकडे

मनसेचे पुणे शहरातील डॅशिंग नेते वसंत मोरे यांचे भावी खासदार म्हणून कालच बॅनर लागले होते. त्यानंतर आता वसंत मोरे यांनी गुरुवारी माऊलीच्या पालखीचे दर्शन घेतले. यानंतर टीव्ही ९ मराठीशी बोलताना वसंत मोरे म्हणाले की, माऊलींना मी साकडं घातले आहे. माऊलींना म्हटले की, माझा पक्ष वाढो… पुढच्या वर्षी माऊलींच्या दर्शनाला येताना पुण्याचा खासदार होऊन यायला आवडेल…यामुळे आता पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे यांनी तयारी सुरु केल्याचे स्पष्ट झाले आहे. मनसे नेते राज ठाकरे यांनी पुणे लोकसभेसाठी भाजप-शिवसेना युतीला पाठिंबा दिला नाही तर मनसेकडून वसंत मोरे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरु झाली आहे.

आळंदीवर काय म्हणाले मोरे

आळंदीमध्ये वारकऱ्यांवर लाठीहल्ला झाला होता. आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थानावेळी वारकरी आणि पोलीस यांच्यात किरकोळ वाद आणि झटापटी झाली. यावेळी पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीमार केल्याचा आरोप होत आहे. त्यासंदर्भातील व्हिडिओ समोर आले. त्यावर बोलताना वसंत मोरे यांनी म्हटले की, आळंदीची घटना दुर्देवी आहे. आळंदी सारखी घटना पुन्हा घडू नये प्रशासनाला विनंती आहे.

हे सुद्धा वाचा

सिंहगड रोडला लागले बॅनर

भाजपकडून शहराराध्यक्ष जगदीश मुळीक, राष्ट्रवादीकडून शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे लागले होते भावी खासदार म्हणून बॅनर्स काही महिन्यांपूर्वी लागले होते. आता पुण्यातील सिंहगड रोड परिसरात वसंत मोरे यांचे बॅनर्स लागले राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लागले. वसंत मोरे यांच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा सुरु झाली. त्याला आज वसंत मोरे यांच्याकडून दुजोरा मिळाला.

हे ही वाचा

पुण्यात भावी खासदाराच्या स्पर्धेत मनसेची उडी, वसंत मोरे यांचे लागले बॅनर

अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.