Raj Thackeray| पुणे महानगरपालिका निवडणूक; मनसे अध्यक्ष राज ठाकरे 25 तारखेला पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता
महापालिकेची निवडणूक लक्षात घेत मनसेने सर्व तयारी केली आहे . निवडणुकीची तयारी करण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात मनसे निरीक्षक नेमल्याची माहिती दिली आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे याच दौरा महत्त्व ठरणार आहे. यापूर्वी १५ डिसेंबरला राज ठाकरे यांनी पुण्याचा दौरा करत कार्यकर्त्याच्या भेटीगाठी घेतल्या होत्या.
पुणे – आगामी महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) निवडणुका लक्षात घेता सर्वत्रच राजकीय पक्षाच्या हालचालीला वेग आला आहे. प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर शहरातीला पक्षाचे नेते, कार्यकर्ते चांगलेच सक्रिय झाले आहेत. यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एका महापालिका निवडणुकांवर आपले लक्ष केंद्रित केलं आहे. याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येत्या (दि25)फेब्रुवारीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे(President Raj Thackeray) पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता वर्तवली आहे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वच जागा लढवण्याची तयारी मनसेने (MNS)केली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात काही दिवसांपूर्वी मुंबईमध्येही मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठकी घेतली होती.
मनसे निरीक्षकांची नेमणूक
महापालिकेची निवडणूक लक्षात घेत मनसेने सर्व तयारी केली आहे . निवडणुकीची तयारी करण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात मनसे निरीक्षक नेमल्याची माहिती दिली आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे याच दौरा महत्त्व ठरणार आहे. यापूर्वी १५ डिसेंबरला राज ठाकरे यांनी पुण्याचा दौरा करत कार्यकर्त्याच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यांच्या या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे यावेळीचे भेटही कार्यकर्त्यांसाठी निश्चितच निवडणुकीच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हा दौरा निश्चित महत्त्वपूर्व ठरणार आहे.
100 टक्के आसनक्षमतेने चित्रपटगृहं सुरु करावी
राजकीय मेळाव्यांना खच्चून गर्दी आहे…रेस्टॉरंट्स, पब्जमध्ये तुडुंब पार्ट्या सुरु आहेत… मॉल्समध्ये खरेदीसाठी झुंबड उडालेली आहे पण तरीही नाट्यगृहं-चित्रपटगृहं अजूनही पन्नास टक्के क्षमतेनेच चालवायची असा महाआघाडी सरकारचा अजब न्याय आहे हा अन्याय आतातरी सरकारने दूर करावा. ‘पावनखिंड’ सारख्या भव्य ऐतिहासिक चित्रपटापासून १०० टक्के आसनक्षमतेने चित्रपटगृहं सुरु करावीत,अशी आग्रही मागणी मनसे चित्रपटसेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केली आहे.
महाबळेश्वरचीच स्ट्रॉबेरी पाहिजे, मग आता नाही होणार फसवणूक..! कृषी पणन मंडळाचा रामबाण उपाय
VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 13 February 2022