पुणे विद्यापीठात मनसे आक्रमक, निकृष्ट जेवण अधिकाऱ्यांना घातले खाऊ, थेट दिला इशारा…

Savitribai Phule Pune University: तीन दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना कँटीनमध्ये दिलेले जेवण निकृष्ट होते. भाजी आंबट लागत होती. यावेळी विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला होता. विद्यार्थ्यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्यांना जाब विचारला होता. त्यानंतर जेवण अर्धवट सोडून दिले होते. हा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

पुणे विद्यापीठात मनसे आक्रमक, निकृष्ट जेवण अधिकाऱ्यांना घातले खाऊ, थेट दिला इशारा...
पुणे विद्यापीठात मनसेचे आंदोलन
Follow us
| Updated on: Apr 27, 2024 | 1:08 PM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात देशभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. पुणे विद्यापीठ देशातील पहिल्या दहा विद्यापीठांमध्ये आहे. विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील दिल्या जाणाऱ्या जेवणाचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या कॅन्टीनमध्ये निकृष्ट जेवण मिळते. यासंदर्भात विविध संघटनांनी अनेक वेळा कुलगुरु आणि प्रशासनाला जाब विचारला. आंदोलने केली. काही दिवसांसाठी त्यात सुधारणा झाल्या. परंतु पुन्हा तोच प्रकार सुरु झाला. आता पुन्हा विद्यापीठातील निकृष्ट जेवणाचा विषय समोर आला आहे. यामुळे पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक झाली. मनसेच्या विद्यार्थी सेनेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलन करत अधिकाऱ्यांना निकृष्ट जेवण खाण्यास दिले.

कॅन्टीन व्यवस्थापकला जाब विचारला

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने प्रशासनातील अधिकाऱ्यांना निकृष्ट जेवण्याच्या विषयावरुन धारेवर धरले. कँन्टीनचे व्यवस्थापक, भोजन समिती अध्यक्ष यांना जाब विचारला. यावेळी मनविसे पदाधिकाऱ्यांनी जेवणाची ताटे थेट कुलगुरूंच्या ऑफिस आवारात नेली. कॅन्टीनची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांना बोलावून विद्यार्थी खातात ते नित्कृष्ट जेवण संबंधिताना खायला घातले.

पुणे विद्यापीठात मनसे आंदोलन

जो पर्यंत जेवणाचा दर्जा सुधारत नाही तसेच विद्यार्थांना पौष्टिक, दर्जेदार जेवण माफक दरात मिळणार नाही, तोपर्यंत विद्यार्थी आंदोलन सुरुच ठेवण्यात येणार आहे. विद्यार्थी जे जेवण जेवतात तेच जेवण दररोज विद्यापीठ प्रशासनाला खायला घालण्याची आक्रमक भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने घेण्यात आली.

हे सुद्धा वाचा

पुणे विद्यापीठात मनसे आंदोलन

सुधारणा करा, अन्यथा अधिक आक्रमक आंदोलन

तीन दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना पुणे विद्यापीठाच्या कँटीनमध्ये दिलेले जेवण निकृष्ट होते. भाजी आंबट लागत होती. यावेळी विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला होता. विद्यार्थ्यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्यांना जाब विचारला होता. त्यानंतर जेवण अर्धवट सोडून दिले होते. हा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

पुणे विद्यापीठात मनसे आंदोलन

यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने प्रशासनातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळू नका, जेवणाच्या गुणवत्तेत सुधारणा करा, अन्यथा मनसे यापेक्षा आक्रमक आंदोलन करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.