वसंत मोरे धमकी प्रकरणात मोठी अपडेट, साईनाथ बाबर यांची आक्रमक भूमिका, पुणे पोलीस काय करणार?

वसंत मोरे धमकी प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात वसंत मोरे यांनी पुणे मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचं नाव घेतल्याने राजकारणात खळबळ उडाली होती. यानंतर आता साईनाथ बाबर हे आक्रमक झाले आहेत.

वसंत मोरे धमकी प्रकरणात मोठी अपडेट, साईनाथ बाबर यांची आक्रमक भूमिका, पुणे पोलीस काय करणार?
वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांचा फोटो
Follow us
| Updated on: Jul 22, 2024 | 7:15 PM

शिवसेना ठाकरे गटाचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी धमकी प्रकरणी मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचं थेट नाव घेतलं आहे. वसंत मोरे यांना फोनवर अज्ञात इसमाकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. संबंधित इसम धमकी देताना आपण मनसेचा कार्यकर्ता असल्याचंदेखील आपली ओळख सांगत होता. तसेच जुलै महिन्याच्या अखेर पर्यंत आपण वसंत मोरे यांना मारणार, अशी धमकी या इसमाने दिली होती. त्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली होती. यानंतर वसंत मोरे यांनी या धमकी प्रकरणात थेट साईनाथ बाबर यांचं नाव घेतलं होतं. त्यामुळे पुण्यातलं राजकीय वातावरण तापलं होतं. वसंत मोरे यांच्या या आरोपांनंतर आता मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र लिहिलं आहे.

वसंत मोरे धमकी प्रकरणाची सखोल चौकशी करा, अशी मागणी साईनाथ बाबार यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. “वसंत मोरे यांनी धमकी दिल्याची तक्रार पोलिसांना केली आहे. सदर तक्रारीची कसून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी”, अशी मागणी बाबर यांनी पत्रात केली आहे.

साईनाथ बाबर पत्रात नेमकं काय म्हणाले?

“महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहरचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष सुधीर धावडे यांनी फेसबुक या समाज माध्यमावर हवामान खात्याने दिलेल्या अंदाजा संदर्भात केलेल्या एक पोस्टर आलेल्या कमेंटनुसार वसंत मोरे आणि त्याचे साथीदार यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. सदर बाबत पोलीस कारवाई करत आहेत. सदर बाबत मी पुणे शहराध्यक्ष या नात्याने पत्रकार परिषद घेतली होती आणि पोलिसांकडे कारवाईची मागणी देखील केली होती. यामुळे चिडून जाऊन वसंत मोरे हे काही महिन्यांपूर्वी घडलेल्या किंवा आलेल्या एका फोन कॉलवरून पोलिसांकडे तक्रार करून हेतूपरस्पर आरोप करीत आहेत”, असा आरोप साईनाथ बाबर यांनी पत्रात केला आहे.

“सदर बाब अत्यंत गंभीर आहे. सदर फोन कॉल करणाऱ्या मंडळीचा वसंत मोरेंशी संबंधित असण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाला जुन्या घटनांमध्ये ओढून गलिच्छ राजकारण करणाऱ्यांना योग्य धडा शिकवण्यासाठी सबंधित गुन्ह्याचा सखोल तपास करावा. यातील आरोपी जर यांच्याशीच संबंधित असेल तर वरील तक्रारदारांच्या विरोधात कडक कारवाई करावी”, अशी मागणी साईनाथ बाबर यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.