VIDEO : मी सहजासहजी हार मानणारा नाही, पुण्यातील मनसे नगरसेवक वसंत मोरेंचा जिम व्हिडीओ
वसंत मोरेंच्या व्यायामाच्या व्हिडीओवर समर्थकांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. अवघ्या दोन तासांतच या व्हिडीओला 32 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
पुणे : ‘हातोडा पॅटर्न’साठी ओळखले जाणारे पुण्यातील मनसे नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. जिममध्ये वजन उचलतानाचा व्हिडीओ खुद्द वसंत मोरे यांनी फेसबुकवर शेअर केला आहे. “मी सहजा सहजी हार मानणारा नाही…” “मी छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त आहे…!” असं कॅप्शन मोरेंनी या व्हिडीओला दिलं आहे. वसंत मोरेंच्या व्यायामाच्या व्हिडीओवर समर्थकांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. अवघ्या दोन तासांतच या व्हिडीओला 32 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
पाहा व्हिडीओ :
पालिका अधिकाऱ्याची गाडी फोडली
कोरोनामुळे निधन झालेल्या नातेवाईकाचे पार्थिव नेण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने गेल्या वर्षी वसंत मोरे यांनी पालिका अधिकाऱ्याची गाडी फोडली होती. तेच वसंत मोरे उर्फ ‘तात्या’ भेटायला येणार आहेत, असं समजताच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या निवृत्त शिक्षकाचं बिलही माफ झालं होतं. खुद्द वसंत मोरेंनीच सोशल मीडियावरुन हा किस्सा सांगितला होता.
वसंत मोरेंची कोरोनाग्रस्तांना मदत
वसंत मोरे यांनी कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात दिल्याचं त्यांच्या ट्विटर अकाऊण्टवर दिसतं. 27 वर्षांची तरुणी सिद्धी परदेशी अनेक दिवसांपासून अनेक आजारांनी ग्रस्त. त्यात भरीला भर कोरोनाने गाठलं. तिला पुण्यात बेड मिळाला नाही. तेव्हा मनसे कार्यकर्त्यांनी तिला चाकणला बेड मिळवून दिला. या पोरांसारखे नगरसेवक जर पुणेकरांनी माझ्या साथीला 2022 ला निवडून दिले तर कोरोनासारख्या अडचणीलाही सहज हरवेन, असा विश्वास वसंत मोरे यांनी व्यक्त केला आहे.
संबंधित बातम्या :
रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने संताप, पुण्यात मनसे नगरसेवकाने पालिका अधिकाऱ्याची गाडी फोडली
आईशी भांडून चिमुकला ऑटोग्राफसाठी धावला, राज ठाकरेंनी वसंत मोरेंच्या पाठीवर वही ठेवून सही केली!