AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : उगाच कशाला भिजत भाषण करा, भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंची शरद पवारांवर फिरकी

आपल्या सभांना काही हॉल परवडत नाही. पण मी कार्यकर्त्यांना सांगितले एसपी कॉलेज मिळते का बघा. त्यांनी नकार दिला. हल्ली आम्ही कुणाला देत नाही. ठीक आहे. आम्हाला नाही तर कुणालाच नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray : उगाच कशाला भिजत भाषण करा, भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंची शरद पवारांवर फिरकी
शरद पवार यांच्यावर टीका करताना राज ठाकरेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 12:05 PM

पुणे : हवामान (Weather) पाहता कोणत्याही वेळेला पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. काल मुंबईत पडला. म्हटले निवडणुका नाहीत. काही नाही. उगाच कशाला भिजत भाषण करा. निवडणुकांना वेळ आहे, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शरद पवार यांना टोला लगावला. ते पुण्यात बोलत होते. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) टोला लगावला आहे. ते म्हणाले, की आपल्या सभांना काही हॉल परवडत नाही. पण मी कार्यकर्त्यांना सांगितले एसपी कॉलेज मिळते का बघा. त्यांनी नकार दिला. हल्ली आम्ही कुणाला देत नाही. ठीक आहे. आम्हाला नाही तर कुणालाच नाही, असेही ते म्हणाले.

अयोध्या दौऱ्यावरून भाजपावर हल्लाबोल

राज ठाकरे म्हणाले, की मी हट्टाने गेलो असतो. महाराष्ट्रातील सैनिक हिंदू बांधव आले असते. तिथे जर काही झालं असतं. आपली पोरं तर गेली असती अंगावर. तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या. तुम्हाला तुरुंगात सडवलं गेलं असतं. हकनाक कारण नसताना केसेसचा ससेमिरा लावला असता. मी बाळा नांदगावकर आणि सरदेसाईंना सांगितलं आपल्या पोरांना हकनाक घालवणार नाही. सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांवर केसेस टाकल्या असत्या. ऐन निवडणुकीच्यावेळी हे झालं असंत. तेव्हा इथे कोणीच नसतं हा सर्व ट्रॅप होता. एक खासदार उठतो आणि मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो. शक्य आहे का. या गोष्टींना अनेक पापुद्रे आहेत. काही तर तुम्हाला सांगता येणार नाही, अशी टीका त्यांनी केली.

‘आपल्याला राग येत नाही’

आपण बेसावध असतो. मराठ्यांचा इतिहास काळ वगळता इतर अनेक वर्ष आपण पारतंत्र्यात होतो. यासर्वांचा आपल्याला राग येत नाही. याचाच गैरफायदा सत्ताधारी घेत आहेत, अशी टीका त्यांनी केली. आंदोलन करतच राहू. आमच्यावर कितीही केसेस झाल्या तरी, असा निर्धार त्यांनी केला. यासंबंधीचे पत्र घरोघरी पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केले.

हे सुद्धा वाचा

ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकची मस्ती जिरेना... पंतप्रधानांचा कांगावा सुरूच
ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकची मस्ती जिरेना... पंतप्रधानांचा कांगावा सुरूच.
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.