शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचं 100 व्या वर्षात पदार्पण, राज ठाकरेंकडून पायावर डोकं ठेवून नमस्कार

राज ठाकरे यांनी सर्वप्रथम बाबासाहेब पुरंदरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचा सन्मान केला. तसंच त्यांच्या पायावर डोकं ठेऊन त्यांचा आशीर्वादही घेतला. (MNS Raj Thackeray Greets Shivshahir Babasaheb Purandare On Birthday)

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचं 100 व्या वर्षात पदार्पण, राज ठाकरेंकडून पायावर डोकं ठेवून नमस्कार
बाबासाहेब पुरंदरे आणि राज ठाकरे
Follow us
| Updated on: Jul 29, 2021 | 10:22 AM

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (BabaSaheb Purandare) आज शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने पुण्याच्या कात्रजमध्ये एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांनी उपस्थिती लावली. राज ठाकरे यांनी सर्वप्रथम बाबासाहेब पुरंदरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचा सन्मान केला. तसंच त्यांच्या पायावर डोकं ठेऊन त्यांचा आशीर्वादही घेतला. (MNS Raj Thackeray Greets Shivshahir Babasaheb Purandare On Birthday)

बाबासाहेब पुरंदरेंचं शंभरीत पदार्पण

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आज 99 वाढदिवस… आज ते 100 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या सोहळ्याचं आयोजन टाळत त्यांच्या वाढदिवसानिमित्त छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलंय. या कार्यक्रमाला राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली.

राज ठाकरेंनी शिवशाहीरांच्या पायावर डोकं ठेवलं

राज ठाकरे यांनी सर्वप्रथम शिवशाहीरांचा सन्मान केला. गुलाबपुष्प आणि पगडी घालून शिवशाहीरांप्रति त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसंच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पायावर डोकं ठेऊन त्यांचे आशीर्वादही घेतले.

राज ठाकरेंकडून शिवशाहीरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

सुवासिनींनी औक्षण केल्यानंतर राज ठाकरे कार्यक्रमस्थळी आले. शिवशाहिरांचा सन्मान केल्यानंतर, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर आणि आशीर्वाद घेतल्यानंतर राज ठाकरे काहीतरी बोलतील, अशी सगळ्यांना अपेक्षा होती. पण राज ठाकरे काहीही न बोलता तिथून बैठकीसाठी रवाना झाले.

पुरंदरे- ठाकरे कुटुंबांचं जुनं नातं

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि ठाकरे घराण्याचं नातं हे गेल्या काही दशकापासूनचं आहे. बाळासाहेब ठाकरे आणि बाबासाहेब पुरंदरे यांचा विशेष जिव्हाळा होता. बाबासाहेब पुरंदरे यांच्या अनेक व्याख्यानांना बाळासाहेब ठाकरे हजेरी लावायचे. त्यांच्या बरोबर ते राज ठाकरे यांना देखील घेऊन जायचे. बाबासाहेब आणि बाळासाहेबांच्या पुण्या-मुंबईत भेटीही व्हायच्या. यावेळीही राज ठाकरे सोबत असायचे. एकंदरित बाबासाहेबांचं व्यक्तीमत्व राज ठाकरे यांना विशेष भावतं. राज ठाकरेंनी बाबासाहेबांची रायगडावर विशेष मुलाखत घेतली होती.

बाबासाहेब-राज यांचा जिव्हाळा

राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असले आणि वेळ असला की ते आवर्जून बाबासाहेब पुरंदरे यांच्या घरी जात असतात. बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण सन्मान मिळाला होता त्यावेळी देखील राज ठाकरे यांनी पुरंदरेंची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. आजही वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी लावून त्यांनी बाबासाहेबांना शुभेच्छा देत त्यांचे आशीर्वाद घेतले.

(MNS Raj Thackeray Greets Shivshahir Babasaheb Purandare On Birthday)

हे ही वाचा :

VIDEO | अहो आश्चर्यम! बाबासाहेब पुरंदरेंच्या भेटीत राज ठाकरे चक्क मास्कमध्ये

दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.