‘लढायचं ते जिंकण्यासाठीच’, महापालिका जिंकण्यासाठी मनसेचा नवा नारा; पोस्टरवर पहिल्यांदाच अमित ठाकरे!

पुणे महापालिका जिंकण्यासाठी मनसेने कंबर कसली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चार महिन्यांपूर्वी पुण्याचे सातत्याने दौरे केले होते. कार्यकर्त्यांशी संवाद साधतानाच राज यांनी पक्षांतर्गत फेरबदलही केले होते.

'लढायचं ते जिंकण्यासाठीच', महापालिका जिंकण्यासाठी मनसेचा नवा नारा; पोस्टरवर पहिल्यांदाच अमित ठाकरे!
'लढायचं ते जिंकण्यासाठीच', महापालिका जिंकण्यासाठी मनसेचा नवा नाराImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 8:19 PM

मुंबई : पुणे महापालिका (pune corporation) जिंकण्यासाठी मनसेने (mns) कंबर कसली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी चार महिन्यांपूर्वी पुण्याचे सातत्याने दौरे केले होते. कार्यकर्त्यांशी संवाद साधतानाच राज यांनी पक्षांतर्गत फेरबदलही केले होते. आता पुणे महापालिका जिंकण्यासाठी राज ठाकरे यांनी नवा नारा दिला आहे. लढायचं ते जिंकण्यासाठीच हा नारा मनसेकडून देण्यात आला आहे. येत्या 9 मार्च रोजी मनसेचा 16 वा वर्धापन दिन आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात राज यांची सभा पार पडणार आहे. या सभेतूनच लढायचं ते जिंकण्यासाठी हा नारा देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मनसेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पहिल्यांदाच मुंबईच्या बाहेर होत आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून राज ठाकरे कुणाला टार्गेट करणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 7 ते 10 मार्च पर्यंत पुणे दौऱ्यावर आहेत. 9 मार्च रोजी मनसेचा वर्धापन दिन असल्याने पुण्यातच हा सोहळा पार पडणार आहे. पुण्यातील स्वारगेट येथे नेहरू स्टेडियम जवळील गणेश कला क्रीडा केंद्रावर वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी मनसेने पोस्टर्स तयार केले आहेत. या पोस्टर्सवर लढायचं ते जिंकण्यासाठीच असा नवा नारा छापण्यात आला आहे. त्यामुळे मनसेच्याया नव्या नाऱ्याला पुणेकर कशी दाद देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अमित ठाकरे पोस्टरवर

दरम्यान, मनसेच्या वाटचालीत वर्धापन दिनाच्या जाहिरातीवर पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्याबरोबर अमित ठाकरे यांचे छायाचित्र झळकले आहे. अमित ठाकरे हे मनसेमध्ये अधिकच सक्रिय झाले आहेत. त्यांच्याकडे नाशिकचीही जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून अमित ठाकरे यांची मनसे विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अमित यांना मनसेची नवी जबाबदारी मिळाल्यानंतर पोस्टरवर पहिल्यांदाच त्यांचा फोटो झळकला आहे. या पोस्टरवर मनसेचं निवडणूक चिन्ह, राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचेच फोटो आहेत. त्यामुळे आता अमित ठाकरे वर्धापन दिनाच्या रॅलीला संबोधित करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुंबईत शाखा उद्घाटनाचा धडाका

पुण्यापाठोपाठ राज ठाकरे यांनी मुंबईतही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यांच्या हस्ते जा मुंबईतील मनसेच्या चार नव्या शाखांचे उद्घाटन होणार आहे. दोन आठवड्यापूर्वीही राज यांच्या हस्ते मुंबईतील काही शाखांचे उद्घाटन करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा नव्या शाखांचे उद्घाटन होत आहे. कांदिवली, बोरिवली परिसरातील या सर्व शाखा आहेत.

या शाखांचे उद्घाटन

  1. शाखा क्र. 26 चे शाखाअध्यक्ष सुभाष कासार यांच्या शाखेचे उद्घाटन (पत्ता- गड क्रमांक 26, इ एम पी 31, नेपच्यून को.हौ.सो.लि., ठाकुर विलेज, कांदिवली (पू.)
  2. शाखा क्र. 23 चे शाखाअध्यक्ष राजू माने यांच्या शाखेचे उद्घाटन (पत्ता- गड क्रमांक 23, हलीमा चाळ, गणेश चौक, काजुपाडा, बोरीवली पूर्व)
  3. शाखा क्र. 11 चे शाखाअध्यक्ष गणेश पुजारी यांच्या शाखेचे उद्घाटन (पत्ता- गड क्र.11, युनिट नं.3,मंगल दिप बिल्डिंग, नील टॉवर समोर अनिलभाई देसाई मार्ग, देविदास लेन, बोरीवली-पश्चिम)
  4. चारकोप विधानसभा विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन (गणेश नगर, जुना लिंक रोड, ऑस्कर हॉस्पिटलच्या जवळ, रुपारेल ऑप्टिमा साईटच्या बाहेर, कांदिवली ( प.)

संबंधित बातम्या:

Video : शरद पवारांचा राज्यपाल कोश्यारींना जोरदार टोला, तर फडणवीसांचं पवारांना प्रत्युत्तर

मुस्लिम कार्यकर्ता असेल तर त्याचा दाऊदशी संबंध जोडला जातो, माझाही संबंध जोडला होता; पवारांकडून मलिकांना क्लीनचिट

ज्योतिषाचं काम घ्यावं इतकी माझी वाईट अवस्था नाहीये; शरद पवारांचा नेमका टोला कुणाला?

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.