Pune IMD : 9 ऑगस्टपर्यंत पुण्यात मध्यम पाऊस, दिवसाचं तापमानही घसरणार, हवामान विभागाचा अंदाज

6 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट दरम्यान विदर्भात मुसळधार पाऊस पडेल. ढगांचा गडगडाट तसेच विजांच्या कडकडाटासह हा पाऊस पडणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोव्यासाठी 4 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Pune IMD : 9 ऑगस्टपर्यंत पुण्यात मध्यम पाऊस, दिवसाचं तापमानही घसरणार, हवामान विभागाचा अंदाज
गुरुवारी (4 ऑगस्ट) झालेला मुसळधार पाऊसImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 4:17 PM

पुणे : पावसाचा अंदाज असूनही, पुणे येथील भारतीय हवामान विभागानुसार (India Meteorological Department) शहरातील दिवसाचे तापमान वाढत आहे. गुरुवारी पुण्यात दिवसाचे तापमान 32.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले जे सामान्यपेक्षा 4.8 अंश जास्त होते. बुधवारी तसेच पुण्यात दिवसाचे तापमान (Temperature) 31.1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले जे सामान्यपेक्षा 4.5 अंश सेल्सिअस जास्त होते. गेल्या दोन दिवसांपासून शहरात सायंकाळी पावसाने हजेरी लावली. गुरुवारीही संध्याकाळी पुण्यात काही भागात पावसाने हजेरी लावली. सासवडसह काही ठिकाणी तर मुसळधार पाऊस बरसला. आयएमडीच्या अंदाजानुसार, राज्यात शनिवार आणि रविवारपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आयएमडी पुणे (Pune IMD) येथील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले, की 5 ऑगस्टपासून ते 9 ऑगस्टपर्यंत घाट माथ्याच्या क्षेत्रांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

दिवसाचे तापमान घसरणार

पुणे शहरात 9 ऑगस्टपर्यंत सर्वसाधारणपणे ढगाळ आकाश आणि मध्यम पावसाचा अंदाज आहे. पुढील काही दिवसांमध्ये दिवसाचे तापमान 32 अंश सेल्सिअसवरून 26 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. रात्रीचे तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल, असे कश्यपी म्हणाले. ते पुढे म्हणाले, की महाराष्ट्रातील चारही उपविभागांमध्ये 6 ऑगस्टपासून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

ढगांच्या गडगडाटासह पाऊस

6 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट दरम्यान विदर्भात मुसळधार पाऊस पडेल. ढगांचा गडगडाट तसेच विजांच्या कडकडाटासह हा पाऊस पडणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोव्यासाठी 4 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे, असे कश्यपी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

पुण्यात तापमानात वाढ

तारीख – दिवसाचे तापमान – सामान्यपेक्षा जास्त (सरासरी)

  1. 4 ऑगस्ट – 32.3°C -4.8°C
  2. 3 ऑगस्ट – 32.1°C – 4.5°C
  3. 2 ऑगस्ट – 30.7°C -3.1°C
  4. 1 ऑगस्ट – 31.2°C – 3.6°C
  5. 31 जुलै – 31.7°C – 4.1°C
  6. 30 जुलै – 31.7°C – 4.1°C
  7. 29 जुलै – 31.5°C – 4.1°C

बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.