Monsoon News : मान्सूनने संपूर्ण राज्य व्यापला, हवामान विभागाची घोषणा

Monsoon and Rain in Maharashtra : अखेर संपूर्ण राज्यात मान्सून सक्रीय झाला आहे. पुणे हवामान विभागाने त्याची घोषणा केली आहे. सध्या पुणे, मुंबईत जोरदार पाऊस झाला आहे. आता मान्सूनची पुढची वाटचाल कशी राहणार?

Monsoon News : मान्सूनने संपूर्ण राज्य व्यापला, हवामान विभागाची घोषणा
Follow us
| Updated on: Jun 25, 2023 | 2:53 PM

पुणे : जून महिन्याच्या शेवटचा आठवडा आल्यावर मुंबईमध्ये मान्सून दाखल झाला आहे. पुणे अन् मुंबई जोरदार पाऊस झाला. तसेच पुढील 24 तास मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देखील हवामान विभागाने दिलेला आहे. मुसळधार पावसामुळे समुद्रात हाय टाईड देखील होणार आहेत. त्यामुळे रविवारी सुटी असताना मुंबईतील चौपटी पर्यटनासाठी बंद केली आहे. पुणे शहरात शनिवारी पाऊस झाल्यानंतर रविवारी दुपारी जोरदार पाऊस सुरु झाला. आता मुंबई, पुणेपर्यंत मर्यादीत असलेला पाऊस संपूर्ण राज्यात दाखल झाला असल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसळीकर यांनी दिली.

मान्सूनमुळे आता राज्यभर पाऊस

यंदा मान्सून लांबतच चालल्याने राज्यातील अनेक जलप्रकल्पांतील उपयुक्त साठा कमी झाला होता. राज्यातील मोठे अन् मध्यम प्रकल्पांतील साठाही कमी होत होता. यामुळे शहरी भागातही चिंता निर्माण झाली होती. परंतु आता आनंदाची बातमी आली आहे. राज्यात मान्सूनने सक्रीय झाला आहे. भारतीय हवामान विभागाने ही माहिती दिली. तसेच गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीर वगळता संपूर्ण देशात मान्सून सक्रीय झाला आहे.

हे सुद्धा वाचा

आगामी अंदाज काय

मान्सून दाखल झाल्यानंतर राज्यात पुढचे 5 दिवस सक्रिय राहणार आहे. पुढील पाच दिवसांत कुठे कुठे पाऊस असणार आहे, त्याची माहिती हवामान विभागाने दिली. त्यानुसार कोकण अन् विदर्भात मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडणार आहे. पुणे, सातारा, नाशिकमध्येही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच मध्य महाराष्ट्र अन् मराठवाडामध्ये ही पावसाचा जोर कायम असणार आहे.

रविवारी अनेक ठिकाणी पाऊस

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत रविवारी पाऊस सुरु झाला आहे. यामुळे राज्यात सर्वत्र गारवा निर्माण झाला आहे. रविवारी कोकण, विदर्भातील काही भाग अन् मुंबई, पुणे भागात पाऊस पडत आहे. पुण्यात रविवारी दुपारी पुन्हा जोरदार पावसाला सुरूवात झाली. शहरातील अनेक भागांमध्ये पावसाची जोरदार हजेरी लावली. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर रात्रभर आणि आज सकाळपासून पावसाने पुण्यात विश्रांती घेतली होती. परंतु आता पुन्हा एकदा शहर अन् परिसरात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. आता आज अन् सोमवारीही पुणे शहरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.