Monsoon | मॉन्सूनने घेतला निरोप, अलनिनोचा प्रभाव, सरासरीपेक्षा कमी पाऊस

weather update return monsoon | देशभरात यंदा पावसाची तूट राहिली. यंदा निरोप घेतानाही मॉन्सून कोसळलाच नाही. यामुळे आता शेतीसह पिण्याच्या पाण्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. यंदा नेहमीपेक्षा उशिराने मॉन्सूनने निरोप घेतला आहे.

Monsoon | मॉन्सूनने घेतला निरोप, अलनिनोचा प्रभाव, सरासरीपेक्षा कमी पाऊस
Follow us
| Updated on: Oct 20, 2023 | 8:46 AM

पुणे, नवी दिल्ली | 20 ऑक्टोंबर 2023 : गेली चार वर्ष सामान्य आणि सामान्यपेक्षा जास्त पाऊस देशभरात झाला होता. परंतु यंदा उशिराने दाखल झालेला मॉन्सून चिंता निर्माण करुन गेला. राज्यात आणि देशात यंदा मॉन्सून उशिराने आला. त्यानंतर पावसाचा मोठा खंड पडला. ऑगस्ट महिना वगळता राज्यात चांगला पाऊस झाला नाही. यामुळे सर्व अपेक्षा परतीच्या पावसावर होती. परंतु परतीचा पाऊस चांगला झाला नाही. यामुळे यंदा चिंता निर्माण करणारी परिस्थिती असणार आहे. पावसाच्या या तुटीचा परिणाम शेती आणि पिण्याच्या पाण्यावर होणार आहे. पुन्हा पुढच्या वर्षीच आता मॉन्सून भेटणार आहे.

सरासरीपेक्षा कमी पाऊस

यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी झाला आहे. देशभरात मॉन्सूनवर अल निनोचा प्रभाव होता. देशात पावसाची सरासरी ८६८.६ मिमी आहे. परंतु यंदा ८२० मिमीच पाऊस झाला. २०२३ च्या चार वर्षांपूर्वी चांगला पाऊस झालेला होता. सामान्य आणि सामान्यपेक्षा चांगला पाऊस या चार वर्षांत झाला. परंतु आता सामान्यपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे अनेक भागांत पाण्याची टंचाई जाणावणार आहे. तसेच कमी पावसाचा परिणाम यंदा रब्बी हंगामावर होणार आहे.

चार दिवस उशिराने परतला मॉन्सून

देशभरातून मान्सून परतल्याची घोषणा हवामान विभागाने केली आहे. यंदाच्या पावसावर अल निनोचा प्रभाव असल्यामुळे कमी पाऊस झाला. दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी परतणारा पाऊस यंदा १९ ऑक्टोबर रोजी देशातून परतला आहे. त्यानंतर परतीच्या पावसाने राज्यात आणि देशात दिलासा दिलेला नाही. यंदा राज्यातील अनेक प्रकल्प पूर्णपणे भरलेले नाही. यामुळे उन्हाळ्यात पाण्याचे नियोजन करणे अवघड होणार आहे.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण 11.4 टक्क्यांनी घटले

महाराष्ट्रात पावसाची मोठी तूट राहिली आहे. यंदा राज्यात पावसाचे प्रमाण ११.४ टक्के कमी राहिले आहे. कोकण वगळता इतर ठिकाणी परतीचा पाऊस झाला नाही. राज्यात सरासरीच्या ८८.६ टक्केच पाऊस झाला आहे. सामान्यपणे ९६ टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला तर हा पाऊस सरासरी इतका समजला जातो. परंतु यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.