Monsoon Update : कुठे मुसळधार ते कुठे उष्णतेची लाट, काय आहे मान्सूनचा मूड

Monsoon Update : राज्यात नैऋत्य मान्सूनचे आगमन झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाकडून ११ जून रोजी करण्यात आली होती. परंतु मान्सून अजूनही सक्रीय नाही. शेतकऱ्यांनी पेरणी अजून करु नये. जमिनीतील ओलीचा अंदाज घेऊन जुलैमध्ये पेरणी करावी.

Monsoon Update : कुठे मुसळधार ते कुठे उष्णतेची लाट, काय आहे मान्सूनचा मूड
monsoon and farmer
Follow us
| Updated on: Jun 19, 2023 | 8:46 AM

पुणे, नवी दिल्ली : बिपरजॉय चक्रीवादळ येऊन गेले. परंतु या चक्रीवादळाने आपले परिणाम दाखवला. चक्रीवादळामुळे देशातील काही भागांत मुसळधार पाऊस सुरु आहे. तर काही भागात उष्णतेची लाट आहे. महाराष्ट्रात मान्सूनची वाटचाल थांबली आहे. चक्रीवादळाने मान्सूनवर परिणाम केला आहे. राज्यात मान्सून ११ जून रोजी कोकणात दाखल झाला होता. त्यानंतर १५ जूनपर्यंत मान्सून राज्यभर पोहचणार होता. परंतु मान्सून अजूनही सक्रीय झालेला नाही. तो थांबला आहे. त्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.

कुठे सुरु आहे मुसळधार पाऊस

बिपरजॉय वादळाचा परिणाम देशातल्या मान्सूनवर झाला आहे. गुजरात आणि राजस्थान राज्यात मुसळधार पाऊस होत आहे. आसाम मेघालय मणिपूर मिझोरम राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. ईशान्येकडील राज्यांमध्येही मुसळधार पाऊस होत आहेत. परंतु दुसरीकडे महाराष्ट्रासह अनेक राज्यात मात्र उष्णतेची लाट आली आहे. उत्तर प्रदेश बिहार झारखंड पश्चिम बंगाल तेलंगणा राज्यात उष्णतेची लाट आहे. पावसाचा असलेला जून महिना संपण्यात काही दिवस असताना या राज्यांमध्ये उष्णतेची लाट आली आहे.

आतापर्यंत किती झाला पाऊस

जून महिन्यात संपूर्ण देशभरात फक्त 37 टक्के पाऊस झाला आहे. राज्यातील मान्सून अजूनही कोकणात थांबला आहे. २२ जूननंतर त्याची वाटचाल सुरु होणार आहे. कोकणात २२ जूनपर्यंत काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

पेरणी कधी करावी

राज्यात अजूनही पाऊस सुरु झालेला नाही. येत्या पंधरवड्यात कोकण, विदर्भ अन् मराठवाड्यात पेरणीयोग्य तर सह्याद्री घाटामध्ये अन् मध्ये महाराष्ट्रात साधारण मोसमी पाऊस पडणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी ७ जुलैनंतर जमिनीतील ओलीचा अंदाज घेऊन पेरणीचा निर्णय घ्यावा, असे निवृत्त हवमान अधिकारी माणिकराव खुळे यांनी म्हटले आहे.

शेतकरी हतबल

हवामान खात्याच्या अंदाजा वरून यंदा मान्सून लवकर येणार असा अंदाज व्यक्त केला केला होता. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण होते आणि त्यांनी मोठ्या उत्साहाने मान्सूनपूर्व कपाशी लागवड केली मात्र यावर्षी हवामान खात्याचा अंदाज फोल ठरला. मृग नक्षत्र लागून व जून महिना संपत येत असला तरीही तापमानात वाढ तेवढीच आहे. उष्णतेच्या तडाख्याने होरपळलेल्या जीवाची लाही लाही होताना दिसत आहे.

दुपारच्या वेळेस अचानक आभाळ दाटून येत असले तरीही पाऊस काही पडत नाही. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे त्यांनी आपल्या परीने कपाशी लागवड करून आपल्या सोयीने सिंचन ने पाणी देणे सुरू केले आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय नसून फक्त वरच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकर्‍यांची मात्र कपाशी लागवड अजूनही झाली नाही. आता मान्सून केव्हा दाखल होणार अशा चिंतेने शेतकरी वर्ग हतबल झालेला दिसत आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.