Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon Update : मान्सूनने चाल बदलली, काही दिवसांचे वेटींग, का होणार मान्सूनला उशीर?

Monsoon and weather Update : जून महिना सुरु झाला अन् शेतकऱ्यांसह सर्वांना मान्सूनची प्रतिक्षा लागली. ४ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार होता. परंतु अजूनही मान्सून केरळमध्ये दाखल झालेला नाही. त्यामुळे मान्सूनसाठी काही दिवसांचे वेटींग करावे लागणार आहे.

Monsoon Update : मान्सूनने चाल बदलली, काही दिवसांचे वेटींग, का होणार मान्सूनला उशीर?
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 8:33 AM

पुणे : मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस झाला होता. हा पाऊस म्हणजे वाळवाचा पाऊस म्हटला जात होता. यामुळे वळवाचा पावसानंतर मान्सून दाखल होणार होता. मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झाले होते. परंतु अचानक मान्सून रुसला, त्याने आपली चाल बदलली. आता काही दिवसांची अजून प्रतिक्षा मान्सूनसाठी करावी लागणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. केरळमध्ये अजून मान्सून दाखल झाला नसल्यामुळे राज्यात मान्सूनला उशीर होणार आहे.

का होणार उशीर

हे सुद्धा वाचा

आग्नेय अरबी समुद्रात लक्षद्वीपवर सोमवारी चक्रीवादळ निर्माण झाले आहे. यामुळे मान्सूनचे आगमन लांबले आहे. या चक्रीवादळामुळे केरळ आणि किनारी कर्नाटक प्रदेशात येत्या एक-दोन दिवसांत पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. परंतु तो मान्सूनचा पाऊस नसणार आहे.

कुठे अडकला मान्सून

मान्सूनची उत्तर सीमा गेल्या चार दिवसांपासून एकाच ठिकाणी अडकली आहे. अरबी समुद्रात पश्चिमेकडील वाऱ्यासह केरळच्या दिशेने संथ गतीने सरकणारे ढग चक्रीवादळामुळे खेचले गेले आहे. केरळच्या किनारपट्टीवर दक्षिण अरबी समुद्रातील पश्चिमेचे वारे समुद्रसपाटीपासून सुमारे २.१ किमी उंचीपर्यंत वाहत आहेत, पण मान्सूनसाठी ते ४.६ किमीपेक्षा जास्त हवे आहे. अरबी समुद्रात तयार झालेले चक्रीवादळ येत्या २४ तासांत कमी दाबाच्या क्षेत्रात बदलण्याची शक्यता आहे. अजूनही मान्सून दोन-तीन दिवस तिथेच अडकून राहू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मान्सून अजून केरळच्या वाटेवर

गेल्या 24 तासांत अरबी समुद्राच्या दक्षिण किनार्‍यावर चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे मान्सून केरळला अजूनही पोहचला नाही. केरळमध्ये मान्सून ४ जून रोजी येणार होता. केरळमध्ये मान्सूनला उशीर होत असल्यामुळे राज्यात दाखल होण्यास वाट पाहावी लागणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात दहा जूनपर्यंत मान्सून दाखल होणार होता.

पुण्यात आज पावसाचा इशारा

पुणे अन् परिसरात आज मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणाचे सावट असणार आहे. सोमवारी पुणे शहरात ३४.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. तसेच पुण्यातील तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मगरपट्टा आणि कोरेगाव पार्क येथे १.५ मिलिमीटर आणि १ मिलिमीटर इतका पाऊस झाला.

यंदा राज्यात कसा असणार पाऊस

राज्यात यंदा सरासरीच्या 95 टक्के पाऊस असणार आहे. यामुळे हा पाऊस सामान्य असणार असल्याचा अंदाज आहे. राज्यात जून, जुलै या दोन महिन्यात कमी पाऊस तर ऑगस्ट महिन्यात साधारण पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. पण राज्यभर यंदा पावसाचे प्रमाण सरासरीसारखे आहे. 10 जूनपर्यंत राज्यात मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भासाठी मात्र गुड न्यूज आहे. विदर्भात यंदा 100 टक्के पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

हे ही वाचा

Weather : पुणे शहराला ९०० कोटींचे काय मिळणार, ज्यामुळे हवामानाचा बिनचूक अंदाज होणार

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.