Monsoon Update : मान्सूनसंदर्भातील या कारणांमुळे मिळणार चांगली बातमी

Monsoon and cyclone : जून महिना सुरु झाला अन् शेतकऱ्यांसह सर्वांना मान्सूनची प्रतिक्षा लागली. परंतु मान्सूनला बिपोरजॉय या चक्रीवादळाने रोखून धरले होते. आता हवामान विभागाने चांगली बातमी दिली आहे. मान्सूनसाठी असणारी वेटींग संपणार आहे. त्याची कारणेही आयएमडीने दिली आहे.

Monsoon Update : मान्सूनसंदर्भातील या कारणांमुळे मिळणार चांगली बातमी
Monsoon
Follow us
| Updated on: Jun 07, 2023 | 4:43 PM

प्रदीप कापसे, पुणे : सध्या अरबी समुद्रात चक्रीवादळ आहे. बिपोरजॉय हे चक्रीवादळ आता उत्तरेच्या दिशेने पुढे सरकत आहेत. जसं जसं हे चक्रीवादळ पुढे सरकेल तसा पुढील १२ तासांत त्याचा वेग आणखी वाढणार आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. पूर्वमध्य अन् लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावर मंगळवारी संध्याकाळी चक्रीवादळ “बिपोरजॉय” निर्माण झाले आहे. यामुळे राज्यात नियोजित वेळेनुसार मान्सून उशिराने येत आहे. वादळाचे हे कारण नसते तर आजच्या दिवशी मान्सून तळकोकणात दाखल झाला असता. मान्सूनसंदर्भात हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ के एस होसाळीकर यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

आता आयएमडीचा काय आहे अंदाज

हे सुद्धा वाचा

भारतीय हवामान विभागाने आता चांगली बातमी दिली आहे. चक्री वादळाची तीव्रता आणखीन वाढली आहे. गोव्यापासून वादळ जवळपास 860 किलोमीटर लांब आहे. मुंबईपासून 970 किलोमीटर लांब आहे. पुढच्या काही तासांत वादळ उत्तरेकडे जाणार आहे. किनार पट्टीवर या वादळाचा थेट परिणाम नसणार आहे. परंतु येत्या 48 तासात मान्सून केरळमध्ये दाखल आहे.

चक्रीवादळ खोल समुद्रात असल्याने मुंबईसह कोकण किनारपट्टीवर फार पावसाची शक्यता नाही, असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. तरी, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारांनी खोल समुद्रात मच्छिमारीसाठी जाऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. सध्या अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाल्याची माहिती आहे. तीन तासांत या चक्रीवादळाचा वेग हा ११ किलोमीटर प्रतितास इतका झाला आहे. पुढील १२ तासात त्याचा वेग आणखी वाढणार आहे.

काय आहेत कारणे

  • दक्षिण अरबी समुद्रावर पश्‍चिमेकडील वारे कायम आहेत.
  • पश्चिमेकडील वाऱ्यांच्या उंचीमध्ये वाढ झाली आहे.
  • अरबी समुद्र, लक्षद्वीप, केरळ किनार्‍यावरील ढगाळ वातावरणात वाढ झाली आहे.
  • या सर्व कारणांमुळे पुढील ४८ तासांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रात कधी येणार पाऊस

केरळमध्ये दाखल झाल्यानंतर आठ दिवसांत त्याचा प्रवास महाराष्ट्राकडे होता. यामुळे ८ जून रोजी मान्सून केरळमध्ये आला तर राज्यात सुमारे 15 जूनच्या आसपास पाऊस दाखल होण्याची चिन्हे आहेत. पण, त्याबाबत हवामानशास्त्र विभागाने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.