Monsoon Update : यंदा मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली महत्वाची बातमी
Monsoon Update : मे महिन्यातील दुसरा आठवडा heat waveचा ठरला. या आठवड्यात तापमान ४० अंशाच्या वर गेले आहे. आता उष्णतेपासून कधी दिलासा मिळणार आणि मान्सून कधी येणार? याचे वेध सर्वांना लागेल आहे. हवामान विभागाचा याबाबत अंदाज आला आहे.
पुणे : मे महिन्याची सुरुवात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाने झाली होती. परंतु गेल्या आठवड्यापासून मे हिटचा तडखा बसत आहे. राज्यासह देशभरात तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. विदर्भ आणि खान्देशातील तापमान ४४ अशांवर गेले आहे. वाढत्या उन्हापासून कधी दिलासा मिळणार? मान्सून कधी येणार? याकडे शेतकरी वर्गच नाही तर सर्वसामान्य लोकांचे लक्ष लागले आहे .
कधी येणार मान्सून यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात पर्जन्यराजाचे आगमन होणार असल्याची बातमी हवामान विभागाने दिली आहे. यावर्षी सरासरी ९६ टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय हवामान विभाग, मुंबई आणि प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख सुनील कांबळे यांनी वृत्तसंस्थेला मान्सूनबाबत माहिती दिली. त्यानुसार मुंबईत यंदा १० किंवा ११ जूनला मान्सूनचे आगमन होणार आहे.
किती पडणार पाऊस दिर्घकालीन अंदाजानुसार राज्यात ९६% पर्यंत सामान्य मान्सून होणार आहे. राज्यात यंदा ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे, असा अंदाज आहे. हवामान विभागाकडून मे महिन्याच्या अखेरीस मान्सूनचा पुन्हा अपडेट येणार आहे, त्यावेळी अधिक चित्र अधिक स्पष्ट होईल, असेही सुनील कांबळे यांनी सांगितले. महाराष्ट्रात आगमन झाल्यावर पावसाचा पुढील प्रवास कसा असेल याबाबतची सविस्तर माहिती महिना अखेरीस सांगण्यात येणार आहे.
यापूर्वीचा अंदाज काय होता यापूर्वीचा अंदाजानुसारही यंदा देशात मान्सून साधारण म्हणजे 96 टक्के दाखवण्यात आला होता. आयएमडीने 1951 ते 2022 या मान्सून मॉडेलचा अभ्यास करून हा अंदाज वर्तवला आहे. जर देशात 90 ते 95 टक्के पाऊस झाला तर तो सामान्यपेक्षा कमी समजला जातो. 96 ते 104 टक्के हा सामान्य पाऊस आहे. जर 110 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला तर जास्त पाऊस असतो. 90 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला तर दुष्काळ समजला जातो.
पुढील अंदाज केव्हा
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयएमडीचा नवा अंदाज येणार आहे. त्यावेळी अल नीनोच्या परिणामासंदर्भात बोलता येणार आहे. अल नीनो असणार आहे, परंतु त्याचा मोठा प्रभाव नसेल. भारतात जुलै महिन्यात अल निनो सक्रिय होत आहे. परंतु आजवर 15 वेळा अल नीनो सक्रिय असताना मान्सून 6 वेळा अतिवृष्टी देऊन गेला आहे. अन्यथा तो साधारण पाऊस देऊन गेला. अल नीनो चा मान्सूनशी 40% संबध गृहीत धरला जातो.
कसा असणार मान्सूचा प्रवास
- १० ते ११ जून दरम्यान मुंबईत धडकणार
- ९६ टक्के सरासरी पावसाचा अंदाज
- ८७ मिमी सरासरी पाऊस होणार