महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी, लोकसभा निवडणुकीनंतर प्रथम शरद पवार यांच्या मोदीबागेत सुनेत्रा पवार

sharad pawar sunetra pawar: शरद पवार यांच्या मोदीबागेत खासदार सुनेत्रा पवार पोहचल्या आहेत. सुमारे तासभरापेक्षा जास्त वेळ खासदार सुनेत्रा पवार मोदी बागेत होत्या. त्यावेळी शरद पवार त्याच ठिकाणी होते. परंतु सुनेत्रा पवार यांनी मोदी बागेत कोणाची भेट घेतली आणि काय चर्चा झाली, ही माहिती मिळू शकली नाही.

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी, लोकसभा निवडणुकीनंतर प्रथम शरद पवार यांच्या मोदीबागेत सुनेत्रा पवार
sunetra pawar, sharad pawar
Follow us
| Updated on: Jul 16, 2024 | 11:28 AM

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांपासून पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत आहेत. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईतील सिल्वर ओकवर गेले होते. त्यांची बंद दाराआड तास-दीडतास चर्चा झाली. त्यानंतर मंगळवारी शरद पवार यांच्या मोदीबागेत खासदार सुनेत्रा पवार पोहचल्या आहेत. सुमारे तासभरापेक्षा जास्त वेळ खासदार सुनेत्रा पवार मोदी बागेत होत्या. त्यावेळी शरद पवार त्याच ठिकाणी होते. परंतु सुनेत्रा पवार यांनी मोदी बागेत कोणाची भेट घेतली आणि काय चर्चा झाली, ही माहिती मिळू शकली नाही. मात्र, दोन दिवसांपासून राज्यातील राजकारणाची दिशा पुन्हा शरद पवार यांच्याकडे सुरु झाली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच…

लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे बारामतीतून निवडणुकी मैदानात होत्या. त्यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवणुकीत उतरल्या होत्या. नणंद-भावजय यांच्या या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. त्यावेळी संपूर्ण पवार कुटुंबिय अजित पवार यांच्या विरोधात गेले होते.

अजित पवार यांचे सख्ख्ये बंधूसुद्धा त्यांच्या विरोधात प्रचारात होते. या निवडणुकीत पवार कुटुंबियांमध्येच आरोप-प्रत्यारोप झाले होते. निवडणूक निकालात सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली. या निवडणुकीनंतर प्रथमच सुनेत्रा पवार शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी मंगळवारी गेल्या. त्यावेळी शरद पवार मोदीबागेतच होते. सुमारे तासभर सुनेत्रा पवार त्या ठिकाणी होत्या. परंतु त्यांनी कोणाची भेट घेतली? शरद पवार यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली का? ही माहिती मिळाली नाही.

हे सुद्धा वाचा

सोमवारी भुजबळ यांनी घेतली होती पवारांची भेट

शरद पवार यांना भेटण्यासाठी अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ सोमवारी गेले होते. त्यांनी मुंबईतील सिल्वर ओकमध्ये शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी ओबीसी-मराठा आरक्षणावर राज्यात सुरु असलेल्या वादावर पुढाकार घेण्याची विनंती छगन भुजबळ यांनी पवारांना केल्याचे त्यांनी म्हटले. या भेटीत राजकारणावर कोणतीच चर्चा झाली नाही, असा दावा भुजबळ यांनी केला. परंतु त्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवार पुण्यात शरद पवार यांच्या निवासस्थानी गेल्या आहे. यामुळे राजकारणात पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.