महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट, ‘राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबात फूट नाही’, सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट आणणारी बातमी समोर आली आहे. कारण सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार कुटुंबाबाबत मोठा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार कुटुंबात फूट पडलेली नाही, असं मोठं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट, 'राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबात फूट नाही', सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य
sharad pawar, ajit pawar and supriya pawar Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Mar 05, 2024 | 3:18 PM

पुणे | 5 मार्च 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी ट्विस्ट येणं बाकी आहे की काय? असा प्रश्न निर्माण झालाय. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडलीय हे स्पष्ट आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतंच आपण आपले काका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून वेगळं झालो आहोत, असं स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांसमोर कायदेशीर लढाई पार पडली. या दोन्ही ठिकाणी अजित पवार यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला. अजित पवार यांच्या गटाला खरा पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. तसेच पक्षाचं घड्याळ चिन्हंदेखील अजित पवार यांच्या गटाला मिळालं आहे. पक्षात फूट पडून दोन गट झाल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. असं असताना शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता नवा ट्विस्ट आला आहे. त्यांचं हे वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकारणात अजून अनेक घडामोडी घडायच्या शिल्लक राहिलेल्या आहेत, असं सूचवू तर पाहत नाही ना? असा प्रश्न निर्माण होतोय.

सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि पवार कुटुंबात फूट पडलेली नाही, असं मोठं वक्तव्य केलं आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट नाही आणि पवार कुटुंबातही फूट नाही. आमच्या कुटुंबात जे काही होतं त्याला प्रायव्हसीचा अधिकार आहे. मला, शरद पवार, रोहित पवारांना तो अधिकार नाही, पण आमच्या उर्वरित कुटुंबियांना प्रायव्हसीचा अधिकार आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबात, कौटुंबिक वेळात ज्या काही गोष्टी होतात त्या अर्थातच सांगता येणार नाहीत. आता तुम्ही तुमच्या बायकोशी काय बोलता हे थोडी मला सांगणार आहात”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

यावेळी सुप्रिया सुळे यांना अजित पवार यांच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. अजित पवार तर आमच्यात फूट पडल्याचं स्पष्ट म्हणत आहेत. त्यावर काय सांगाल? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “कुणी कसं वागावं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. ते मी कसं सांगणार? पण एक गोष्ट मला सांगाविशी वाटते की, ही लोकशाही आहे आणि लोकशाहीत चर्चा झाली पाहिजे. आपण आपलं प्रोफेशनल आणि प्रायव्हेट आयुष्य मिक्स करु शकत नाही. तेवढी वैचारिक प्रगल्भता आपल्यात आलेली पाहिजे”, असं मत सुप्रिया सुळे यांनी मांडलं.

‘माझे कुणाशीही मनभेद नाहीत’

“एक तर मी लोकशाहीत काम करते. मी माझे वैयक्तिक संबंध कधीच लपवलेले नाहीत. माझे वैयक्तिक संबंध सगळ्याच पक्षाच्या लोकांसोबत असतात. कारण मी लोकशाहीवर विश्वास ठेवणारी आहे. त्यामुळे माझे सगळ्यांची राजकीय आणि वैचारीक मतभेद आहेत. माझे कुणाशीही मनभेद नाहीत. लोकशाही आहे. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असतो. प्रत्येकाची एक स्टाईल आहे. पक्षामध्ये फूट पडलेली नाहीच. शिवाय पवार कुटुंबात तर अजिबात फूट पडलेली नाही”, असं सुप्रिया सुळे स्पष्ट म्हणाल्या.

निलेश लंके यांच्या संपर्कात आहात का?

यावेळी सुप्रिया सुळे यांना तुम्ही आमदार निलेश लंके यांच्या संपर्कात आहात का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. “एक तर ही लोकशाही आहे. या लोकशाहीत मी सगळ्यांच्याच संपर्कात आहे. कारण मी लोकप्रतिनिधी आहे. लोकप्रतिनिधीचा लोकशाहीमध्ये डायलॉग असलाच पाहिजे. विकासकामे किंवा इतर कामांसाठी चर्चा होतात. यासाठी काश्मीर ते कन्याकुमारी असा एकही खासदार नसेल ज्याकडे कुठल्या ना कुठल्या कामानिमित्त किंवा संपर्क झाला नसेल. एखादा बारामती लोकसभा मतदारसंघाचा व्यक्ती उद्या पंजाबला गेला आणि अडकला, तर आपली ओळख तर असली पाहिजे. त्यावेळेस आम्ही हक्काने एकमेकाला मदत करतो. काही गोष्टी माणुसकी म्हणून करायच्या असतात आणि लोकशाहीमध्ये चर्चा तर व्हायलाच पाहिजे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.