खोकला आला तरी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येते; खासदार उदयनराजे भोसलेंचं अजब विधान

खोकला आला तरी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येते, असं अजब विधान उदयनराजे भोसले यांनी केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (mp udayanraje bhosale statement on coronavirus)

खोकला आला तरी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येते; खासदार उदयनराजे भोसलेंचं अजब विधान
Udayanraje Bhosale
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 4:45 PM

सातारा: आपल्या बिनधास्त आणि बेधडक विधानांमुळे प्रसिद्ध असलेले खासदार उदयनराजे भोसले यांनी आता अजब विधान केलं आहे. खोकला आला तरी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येते, असं अजब विधान उदयनराजे भोसले यांनी केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (mp udayanraje bhosale statement on coronavirus)

खासदार उदयनराजे भोसले यांनी कोरोना विषयी पुन्हा एकदा एक अजब वक्तव्य केल आहे. खोकला आला तरी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी आज साताऱ्यात माध्यमांना दिली. आपल्याला कोराना होता का नाही हे माहीत नाही पण ताप असताना सुद्धा मी गार पाणी प्यायचो. त्यामुळे माझा खोकला वाढला आणि कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली. कोणी काळजी करू नका. मला कोरोना झाला तेव्हा किती लोकांनी देव पाण्यात ठेवले मला माहीत नाही. पण, आज मी तुमच्यासमोर उभा आहे, असा मिश्किल टोला उदयनराजे यांनी लगावला.

ऑगस्टमध्ये कोरोनाची लागण

दरम्यान, ऑगस्टमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले यांना कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यावर उपचार सुरु होते. त्यामुळे संसदेचं अधिवेशन सोडून उदयनराजे साताऱ्यात परतले होते. दरम्यानच्या काळात उदयनराजे यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मागील 3 दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरु होते. कोरोनातून बरे झाल्यानंतर उदयनराजे भोसले पुन्हा एकदा सक्रिय झाले असून अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत.

लॉकडाऊन विरोधात राजेंचं भिक मांगो आंदोलन

दरम्यान, एप्रिल महिन्यात लॉकडाऊन उठवण्याच्या मागणीसाठी उदयनराजे भोसले यांनी भिक मांगो आंदोलन केलं होतं. हाती कटोरा घेत त्यांनी सातारच्या रस्त्यावर भिक मागितली होती. त्यावेळी उदयनराजे तेथील फुटपाथवर कटोरा घेऊन बसले होते. यावेळी लोकांनी त्यांच्या कटोऱ्यात पैसे टाकले होते. ही एकूण रक्कम 450 रुपये इतकी होती. हे पैसे उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मनीऑर्डर करुन उदयनराजे भोसले यांना 450 रुपये परत केले होते.

शनिवारी आणि रविवारी दुकानं बंद ठेवायला कोरोना व्हायरस फक्त तेव्हाच बाहेर येतो का?, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी विचारला होता. राज्यभरातील व्यापाऱ्यांच्या व्यथा सारख्याच आहेत. माणूस जगण्याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. त्यामुळे काळजी घेणे हाच मार्ग आहे. मृत्यूचे प्रमाण पाहता प्रत्येकाला उदंड आयुष्य लाभो, अशा माझ्या सदिच्छा असल्याचे उदयनराजे म्हणाले होते. (mp udayanraje bhosale statement on coronavirus)

संबंधित बातम्या:

मध्य रेल्वेवर येत्या रविवारी कळवा-मुंब्रा दरम्यान 10 तासांचा विशेष ब्लॉक

ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी सरकारचा उपक्रम, ‘शरद शतम आरोग्य कवच विमा योजने’वर काम सुरु

ठाणे-नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, 15 किलोमीटरच्या रांगाच रांगा; प्रवाशांचा तीन तासांपासून खोळंबा

(mp udayanraje bhosale statement on coronavirus)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.