MPSC तर्फे संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट; परीक्षा ‘या’ तारखेला होणार, ॲडमिट कार्ड जारी
पूर्व परीक्षेला सुरुवात होण्यापूर्वी 1 तास आधी परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना नियमांच पालन करून परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं या संदर्भातील परीपत्रक जारी केलं आहे.
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा आयोगानं निश्चित केलेल्या तारखेलाच होणार आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागानं परीक्षा घेण्यास परवानगी दिल्यानं परीक्षेचा मार्ग मोकळा झाला होता. 4 सप्टेंबरला होणार संयुक्त गट ब पूर्व परीक्षा आयोजित केली जाणार आहे, असल्याचं आयोगाकडून परीपत्रकाद्वारे सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं या संदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळं 11 एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. विद्यार्थ्यांसाठी अॅडमिट कार्ड जारी करण्यात आली आहेत.
ॲडमिट कार्ड जारी, परीक्षेपूर्वी 1 तास हजर राहण्याचे आदेश
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट ब ची संयुक्त पूर्व परीक्षा 4 सप्टेंबरला आयोजित केली जाणार आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवारांना हॉलतिकीट उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. 4 सप्टेंबरलाच संयुक्त गट ब ची पूर्व परीक्षा होणार असून आता वेळापत्रकात बदल होणार नाही, असं देखील सागंण्यात आलं आहे. पूर्व परीक्षेला सुरुवात होण्यापूर्वी 1 तास आधी परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना नियमांच पालन करून परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं या संदर्भातील परीपत्रक जारी केलं आहे.
कोरोनामुळे परीक्षा लांबणीवर
मार्च महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा परीक्षेनंतर अनेक विद्यार्थ्यांना कोरोना विषाणू संसर्ग झाला होता. त्यामुळे पुणे, मुंबईसह राज्यात आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता आता 4 सप्टेंबरला परीक्षा आयोजित केली जाणार आहे.
पुढील अपडेटससाठी आयोगाच्या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं परीक्षेचं आयोजनासंदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. त्यामध्ये राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून 3 ऑगस्ट रोजी परीक्षेला परवानगी देणार पत्र प्राप्त झाल्याचं सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोगन 4 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येईल, असं स्पष्ट केलं आहे. तर, परीक्षेच्या आयोजनासंदर्भात पुढील अपडेटस साठी आयोगाच्या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन केलं आहे.
इतर बातम्या:
पीएसआयच्या भरतीत धनगर समाजाला अवघ्या तीन जागा, विद्यार्थी संतापले; एमपीएससी आयोगावर आंदोलनाचा इशारा
MPSC issue notification of combined pre exam will conduct on 4 September admit card released students can download this