MPSC च्या विद्यार्थ्यांनो, अभ्यास सुरु करा, आली मेगा भरतीची जाहिरात

| Updated on: Feb 26, 2023 | 12:20 PM

भरतीची पूर्व परीक्षा ४ जून रोजी राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर होणार आहे. MPSC आयोगाने नोटिस काढली असून ट्विटरवर देखील माहिती दिली आहे.

MPSC च्या विद्यार्थ्यांनो, अभ्यास सुरु करा, आली मेगा भरतीची जाहिरात
Image Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us on

पुणे : MPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एक चांगली बातमी आहे. एमपीएसचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याची मागणी मान्य झाल्यानंतर मंडळाने मोठी भरती काढली आहे. आता MPSC मार्फत राज्य शासनाच्या पाच विभागाची भरती होणार आहे. त्यासाठी प्रक्रिया राज्य लोकसेवा आयोगातर्फे जाहीर केली आहे. तब्बल पाच विभागातील ६७३ पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीची पूर्व परीक्षा ४ जून रोजी राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर होणार आहे. MPSC आयोगाने नोटिस काढली असून ट्विटरवर देखील माहिती दिली आहे.

एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा. नव्या पद्धतीच्या अभ्यासासाठी किमान 5 ते 6 महिने वेळ मिळावा. आयोगानं घाईघाईनं नवी पद्धती अमलात आणू नये.तसेच नवा अभ्यासक्रम यूपीएससीच्या अभ्यासक्रमावर आधारित असल्यानं पुस्तकं उपलब्ध नाहीत. म्हणून ती उपलब्धता करुन द्यावी, विद्यार्थ्यांच्या या मागण्या मान्य झाल्या. त्यानंतर आता ६७३ पदांसाठी जाहिरात काढली आहे.

हे सुद्धा वाचा

नवीन पद्धती जून 2023 पासून लागू होणार होती. मात्र इतक्या कमी वेळेत नव्या पद्धतीचा अभ्यास करण्यास अवधी मिळावा, यासाठी ही नवी पद्धती 2023 पासून लागू करण्याची मागणी केली जातेय. कारण गेल्या चार पाच वर्षांपासून विद्यार्थी जुन्या पद्धतीने अभ्यास करत आहे. आता अचानक नवीन पद्धत केली त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार होते. यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आयोगाने हा निर्णय मागे घेतला.

कोणत्या विभागात भरती

  • सामान्य प्रशासन विभाग
  • पाणी पुरवठा आणि स्वच्छता
  • सार्वजनिक बांधकाम विभाग
  • अन्न आणि नागरी पुरवठा
  • वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग

कधीपर्यंत करता येणार अर्ज

परीक्षेसाठी २२ मार्च पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या पूर्व परीक्षेतील निकालात गुणवत्तेच्या आधारे पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची मुख्य परीक्षा स्वतंत्रपणे घेतली जाणार आहे. ही परीक्षा ७ ते ९ ऑक्टोबर आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट अ आणि गट ब मुख्य परीक्षा १४ ऑक्टोबर, विद्युत अभियांत्रिकी सेवा गट ब मुख्य परीक्षा १४ ऑक्टोबर, निरीक्षक वैधमापनशास्त्र गट ब मुख्य परीक्षा २१ ऑक्टोबर, अन्न आणि औषध प्रशासकीय सेवा गट ब मुख्य परीक्षा २८ ऑक्टोबरला होणार असल्याचे आयोगाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

कुठे किती पदे

  • सामान्य प्रशासन विभागामध्ये २९५ पदे
  • पाणी पुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, मृदा व जलसंधारण विभागात १३० पदे
  • सार्वजनिक बांधकाम विभागात १५ पदे
  • अन्न व नागरी विभागात ३९ पदे
  • वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात १९४ पदे