एमपीएससी पास दर्शना पवार हत्या प्रकरणात आता पोलीस आहेत कोणाच्या शोधात
Pune Cirme News : पुणे एमपीएससी परीक्षा पास झालेली दर्शना पवार हिच्या हत्याप्रकरणात आरोपी अटकेत आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहे. भक्कम पुरावे जमा करत आहे. परंतु त्याच बरोबर या व्यक्तींचाही शोधात आहे.
पुणे : MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन वनअधिकारी पदावर रुजू होणाऱ्या दर्शना पवार हिचे स्वप्न भंगले. वर्ग एक अधिकारी होण्यापूर्वी तिची हत्या झाली. तिच्या हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. दर्शना पवार हिचा मित्र असलेला राहुल हंडोरे यानेच तिची हत्या केली होती, हे स्पष्ट झाले. या राहुल हंडोरे याला पोलिसांनी मुंबईतील अंधेरीहून २२ जून रोजी अटक केली होती. त्यानंतर त्याची पोलीस कोठडीत कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेली शस्त्रही जप्त केली आहेत. परंतु अजूनही पोलीस काही जणांचा शोधात आहे.
काय म्हणतात पोलीस
पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांनी सांगितले की, राहुल हंडोरे याच्याविरोधात भक्कम पुरावे जमा करण्याचे काम सुरु आहे. जिल्हा आणि सत्र न्यायालयात हा खटला सुनावणीसाठी येईल तेव्हा सिद्ध करण्यासाठी आम्ही वैज्ञानिक पुरावे गोळा करत आहोत. हंडोरे याच्या कोठडीत केलेल्या चौकशीतून दर्शनाच्या हत्येसाठी वापरलेले धारदार शस्त्र आणि मोटरसायकल जप्त केली आहे. त्याने गुन्ह्य करण्याच्या आधी आणि नंतर कोणत्या पद्धती वापरल्या हे ओळखण्यासाठी कसून चौकशी केली जात आहे.
यांचीही शोध केला सुरु
दर्शनाची हत्या केल्यानंतर पळून गेल्यानंतर तो कोठे लपला, त्या दरम्यान त्याला कोणी मदत केली? त्यांचा शोध आम्ही घेत आहोत. राहुल याने गुन्ह्यासाठी दोन शर्ट वापरले होते ते अद्याप पोलिसांना मिळालेले नाहीत. परंतु हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेला ब्लेड जप्त केला आहे.
राहुल हंडोरे याने १२ जून रोजी दर्शना हिला राजगडावर फिरण्यासाठी नेले होते. त्यानंतर लग्नाचा विषय काढला. अन् तिने नकार देताच हत्या केली. १८ जून रोजी दर्शनाचा मृतदेह सापडला होता. दर्शनाची हत्या केल्यानंतर राहुल फरार झाला होता. त्याला २२ जून रोजी अटक केली.
हे ही वाचा
एमपीएससी पास दर्शना पवार हत्येसाठी राहुल याने सोमवार का निवडला? पोलीस तपासातून आली माहिती समोर