पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांना आजपासून डबल धक्का, नव्याच नाही जुन्या मार्गावर दरवाढ
मुंबई-पुणे प्रवास करताना आता तुम्हाला जास्त झळ बसणार आहे. तुम्ही एक्स्प्रेस वे जा किंवा जुन्या महामार्गाने जा, तुम्हाला 1 एप्रिलापासून वाढीव टोल द्यावा लागणार आहे. एक्स्प्रेसवर टोल आकारणी 2004 पासून सुरु झाली होती. तेव्हापासून दर तीन वर्षांनी टोलवाढ होत आहे.
मावळ, पुणे : मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांना डबल धक्का बसणार आहे. आता पुण्याहून मुंबई आणि मुंबईहून पुणे कोणत्याही मार्गाने जा, आजपासून वाढीव टोल द्यावा लागणार आहे. देशात सर्वाधिक टोल पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेचा आहे, त्यातही आता 1 एप्रिलापासून वाढ झाली. आता जुन्या महामार्गावरील टोल वाढवण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना जास्त दर देऊन प्रवास करावा लागणार आहे. म्हणजेच पुणे मुंबई प्रवास करणाऱ्यांना डबल झटका शासनाने दिला आहे. या विरोधात दाखल असलेल्या याचिकेवर 5 एप्रिल रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
किती वाढला टोल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस 2004 ला सुरु झाला. त्यावेळी टोल सुरू करताना दर तीन वर्षांनी 18% दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार यापूर्वी वाढ 2020 मध्ये झाली होती. आता 1 एप्रिल 2023 पासून टोलच्या दरात 18 टक्के वाढ करण्यात येणार आहे. ही वाढ फक्त द्रुतगती मार्गावरच नाही तर जुन्या महामार्गवर करण्यात आली आहे. पुणे मुंबई द्रुतगती प्रमाणेच आता जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील टोलमध्ये तब्बल 18 टक्क्यांने वाढ आजपासून केली गेली.
जुन्या महामार्गावरील दरवाढ अशी
फास्टटॅग नसले तर टोल दर
वाहन : जुने दर -नवे दर
- कार : जुने 135 आता 156
- हलके वाहन: जुने 240 आता 277
- ट्रक/बस : जुने 476 आता 551
- अवजड वाहन : जुने 1023 आता 1184
फास्ट टॅग असले तर दर
वाहन जुने दर, नवे दर
- कार : जुने 41 आता 47
- हलके वाहन : जुने 72 आता 83
- ट्रक/बस : जुने 143 आता 165
- अवजड वाहन : जुने 307 आता 355
चक्रवाढ पद्धतीने वाढ
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर चक्रवाढ पद्धतीने दर तीन वर्षांनी वाढ होते. 2017 मध्ये कारसाठी 195 रुपये दर होता. 2020 मध्ये त्यात 40 रुपयांनी वाढ झाली. तो 270 रुपये झाला. आता 2023 मध्ये त्यात 50 रुपयांची वाढ होत आहे आणि तो 320 रुपये केला गेला आहे.
एक्स्प्रेस वे वर किती वाढले दर
चार चाकी वाहन
सध्याचे दर 270 एप्रिल 2023 पासून नवीन दर 320
टेम्पो
सध्याचे दर 430 एप्रिल 2023 पासून नवीन दर 495
ट्रक
सध्याचे दर 580 एप्रिल 2023 पासून नवीन दर 685
बस
सध्याचे दर-797 एप्रिल 2023 पासून नवीन दर 940
थ्री एक्सल वाहन
सध्याचे दर-1380 एप्रिल 2023 पासून नवीन दर 1630
एम एक्सल वाहन
सध्याचे दर-1835 एप्रिल 2023 पासून नवीन दर 2165
पुणे-मुंबई एक्स्प्रेस महामार्ग देशात सर्वाधिक महागडा, आता पुन्हा दरवाढ…वाचा सविस्तर