Pune PMC | महापालिका नव्याने समाविष्ट गावांना करणार मदत ; कचरा उचलणे व प्राक्रियेसाठी करणार तीन कोटी खर्च

या चार गावांत दररोज सुमारे 100 टन कचरा निर्माण होतो. हा कचरा संकलन, वाहतूक तसेच त्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नव्हती. त्यामुळे या कामासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या.

Pune PMC | महापालिका नव्याने समाविष्ट गावांना करणार मदत ; कचरा उचलणे व प्राक्रियेसाठी करणार तीन कोटी खर्च
PMCImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 8:30 AM

पुणे – पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation)नव्याने २३ गावांचा समावेश झाला आहे. यापैकी काही गावांचा कचरा(Garbage) उचलणे तसे त्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम करण्याच्या निविदेस महानगर पालिकेनं मंजुरी दिली आहे. महापालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर महापालिकेवर प्रशासकीय राज सुर झाला आहे. त्यानंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Municipal Commissioner Vikram Kumar) यांनी नुकतीच बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी य विषयाला मंजुरी दिली आहे. 23 पैकी सूस, महाळुंगे, बावधन तसेच कोंढवे, धावडे या चार गावांचा कचरा उचलण्यात येणार आहे. यासाठी तब्बल 3 कोटी 10 लाख रुपयांच्या निविदेस मंजुरी दिली आहे.

निविदा काढल्या

या गावांमध्ये कचरा संकलन तसेच प्रक्रियेची व्यवस्था नसल्याचे सांगत प्रशासनाने यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. याद्वारे पुढील वर्षभरात संकलन, वाहतूक तसेच प्रक्रियेचा खर्च समाविष्ट आहे. उर्वरित 19 गावांमध्ये कचरा संकलन व्यवस्था असून तो संकलित झाल्यानंतर महापालिका त्याची वाहतूक तसेच प्रक्रिया करत असल्याने या गावांसाठी या कामाची गरज नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. या चार गावांत दररोज सुमारे 100 टन कचरा निर्माण होतो. हा कचरा संकलन, वाहतूक तसेच त्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नव्हती. त्यामुळे या कामासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या.

कॅंटोन्मेंट बोर्डलाही करणार मदत

याबरोबरच पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतही मोठ्याप्रमाणात कचरा निर्माण होत आहे. या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतलं आहे. या प्रकल्पासाठी कॅंटोन्मेंट बोर्डाकडून जागा दिली जाणार आहे. या प्रकल्पासाठीचे प्रक्रिया शुल्क तसेच कचरा वाहून नेण्यासाठीचे शुल्क देण्यात येणार आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.