चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, 10व्या फेरीत कसब्याचं चित्र स्पष्ट होईल, 13वी फेरी संपली; काय आहे चित्र?
निवडणुकीत कुठलीही प्रतिष्ठा पणाला लावली नव्हती. तर आम्ही इतर निवडणुकीप्रमाणेच निवडणूक लढलो. आम्ही सगळ्या निवडणुका अशाच प्रकारे लढत असतो. जर आमचा पराजय झाला तर का झाला याची कारणे शोधले जातील.
पुणे : कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. त्यातही कसबा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे सर्वाधिक लक्ष वेधलं गेलं आहे. भाजपने टिळक कुटुंबीयांना तिकीट नाकारल्याने या निवडणुकीत मानापमान नाट्य पाहायला मिळालं. ब्राह्मण समाजाने आपला रोषही व्यक्त केला. त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीत काय होणार? अशी चर्चा रंगलेली असतानाच पहिल्या फेरीपासून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली आहे. मात्र, दहाव्या फेरीनंतरच कसब्याचं चित्र स्पष्ट होईल, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं होतं. मात्र, आता 13वी फेरी संपली असून धंगेकर तब्बल पाच हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे कसब्यात भाजपचा पराभव होत असल्याचं मानलं जात आहे.
सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारलं असता त्यांनी दहाव्या फेरीकडे बोट दाखवलं. कसबा आणि चिंचवडमध्ये होत असलेल्या निवडणुकीत कसब्यामध्ये सध्या आम्ही मागे दिसत असलो तरी सगळे चित्र हे दहाव्या फेरीनंतर स्पष्ट होते. त्यामुळे आता मागे असलो तरी नेमका निकाल आमच्या विरोधात आहे हे आता सांग न कठीण आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
पराभवाची कारणे शोधू
निवडणुकीत कुठलीही प्रतिष्ठा पणाला लावली नव्हती. तर आम्ही इतर निवडणुकीप्रमाणेच निवडणूक लढलो. आम्ही सगळ्या निवडणुका अशाच प्रकारे लढत असतो. जर आमचा पराजय झाला तर का झाला याची कारणे शोधले जातील. मात्र अजून निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालेलं नाही त्यामुळे दहाव्या फेरीपर्यंत त्याची वाट पहावी लागणार आहे असं बावनकुळे म्हणाले होते.
तेराव्या फेरीतही धंगेकर आघाडीवर
दरम्यान, बावनकुळे यांनी दहाव्या फेरीत चित्र स्पष्ट होईल असं म्हटलं असलं तरी आता 13 वी फेरी संपली आहे. त्यातही धंगेकर आघाडीवर आहेत. धंगेकर यांना 49 हजार 120 मते मिळाली आहेत. तर हेमंत रासने यांना 44 हजार 34 मते मिळाली आहेत. हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनना 121 मते मिळाली आहेत. धंगेर हे 13 व्या फेरी अखेर 5 जार 86 मतांची आघाडी घेतली आहे.