AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pimri chinchwad crime | खोट्या गुन्ह्याच्या आरोपामुळेच माझ्या नवऱ्याचा मृत्यू नगरसेविकेच्या आरोपामुळे खळबळ ; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

आश्विनी चिंचवडे यांनी पोलिसात वरील आरोपींच्यामुळे आपल्या पतीचा मृत्यू झाल्याची तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांचे पती गजानन चिंचवडे यांच्याविरोधात 25 जानेवारी 2022 रोजी चिंचवड पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केला.

Pimri chinchwad crime |  खोट्या गुन्ह्याच्या आरोपामुळेच माझ्या नवऱ्याचा मृत्यू नगरसेविकेच्या आरोपामुळे खळबळ ; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
Gajanan chinchawade
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 6:22 PM

पिंपरी – पिंपरीत शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांचा मृत्यू (Gajanan Chinchwade death) झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. मात्र माझ्या नवऱ्याचा मृत्यू खोटा गुन्हा दाखल केल्याने झाला असल्याचा आरोप पत्नी नगरसेविका आश्विनी चिंचवडे (Corporator Ashwini Chinchwade) यांनी केल्याने सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. पत्नी नगरसेविका आश्विनी चिंचवडे यांनी या प्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी(Pimpri Police) शकुंतला बाळू चिंचवडे, दिनेश बाळू चिंचवडे, राजेश बाळू चिंचवडे, महेश उर्फ सुनील बाळू चिंचवडे, ओमकार महेश चिंचवडे, संकेत दिनेश चिंचवडे, वंदना दिनेश चिंचवडे, पुनम महेश चिंचवडे आणि राजेश चिंचवडे यांच्या पत्नी (सर्व रा. चिंचवडेनगर चिंचवड गाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पत्नी नगरसेविका आश्विनी चिंचवडे यांनी पोलिसात वरील आरोपींच्यामुळे आपल्या पतीचा मृत्यू झाल्याची तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांचे पती गजानन चिंचवडे यांच्याविरोधात 25 जानेवारी 2022 रोजी चिंचवड पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केला.तसेच, प्रसिद्धी माध्यमांमध्ये खोटी माहिती देऊन बदनामी करीत त्यांना मानसिक त्रास दिला. त्यामुळे गजानन चिंचवडे यांच्या मृत्यूस आरोपी कारणीभूत ठरल्याचे फिर्यादीत नमूद केलं आहे. त्याचा मृत्यू झाला आहे की आत्महत्या केली आहे. याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. शवविच्छेदन अहवालानंतर चित्र स्पष्ट होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. डॉक्टरांनी देखील व्हिसेरा राखून ठेवल्याने या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे. निगडी पोलिस करीत आहेत.

Rocket Boys Review : भारताचं नशीब बदलवणाऱ्या दोन महान वैज्ञानिकांच्या संघर्षाची गोष्ट, दिग्दर्शकाचं रॉकेट मात्र क्रॅश

शांत स्वभावाच्या लतादिदी जेव्हा मोहम्मद रफींवर भडकल्या, म्हणाल्या, “मी नाही गाणार तुमच्यासोबत”

कट्टर राजकीय विरोधक एकत्र, अजित पवार-हर्षवर्धन पाटील यांच्यात काय चर्चा?

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.