एसटी बस, कारचा भीषण अपघात, मुख्याध्यापकास दोन जणांचा मृत्यू

अपघातात शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक जागीच ठार झाले तर एक शिपाई गंभीर जखमी झाला आहे. जखमी शिपायाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एसटी बस, कारचा भीषण अपघात, मुख्याध्यापकास दोन जणांचा मृत्यू
बस आणि कार अपघातात तीन तरुण ठारImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 18, 2023 | 1:08 PM

नगर : महामार्गावरील अपघात (nagar kalyan highway) रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु त्यानंतरही अपघातांचे सत्र कमी होत नाही. आता शनिवारी नगर-कल्याण महामार्गावर अपघात झाला आहे. एसटी बस आणि कारमध्ये झालेल्या या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नगर जिल्ह्यातील (nagar distric) पारनेर तालुक्यातील धोत्रे गावाजवळ ही घटना घडली आहे. या अपघातात शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक जागीच ठार झाले तर एक शिपाई गंभीर जखमी झाला आहे. जखमी शिपायाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहे.

मुख्यध्यापकांचा मृत्यू

हे सुद्धा वाचा

अहमदनगरमध्ये एसटी बस आणि कारमध्ये अपघात झाल्याची घटना शनिवारी नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर घडली. या अपघातात अकोले येथील सावित्रीबाई फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक नामदेव दादाभाऊ बर्वे आणि कळंब तालुका अकोले येथील विद्यालयाचे सहायक शिक्षक ईश्वरचंद्र रामचंद्र पोखरकर यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेले शिपाई अविनाश कुंडलिक पवार यांच्यावर अहमदनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने मदत पुरवली. यामुळे जखमी अविनाश पवार यांच्यांवर उपचार सुरु झाले.

अपघाताची आकडेवारी चिंताजनक

2022 साली राज्यात एकूण 12 हजार 553 भीषण अपघात झाले. त्यात 13 हजार 528 जणांनी जीव गमावला तर 10 हजार 877 जण गंभीर जखमी झाले. यात राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 3992 तर राज्य महामार्गावर झालेल्या अपघातात 3411 जणांनी प्राण गमावलाय. तर इतर मार्गावर जीव गमावलेल्यांचा आकडा हा 5724 इतका आहे. एक्स्प्रेस हायवेवर अपघातात अनेकांना आपला जीव गमावला आहे. तर कित्येक जण जायबंदी झालेत.

भरधाव वेगानं बेदरकारपणे वाहन चालवणं, टायर फुटणं, लेन कटिंग, ओव्हरटेंगिक यामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर वारंवार अपघाताच्या घटना घडत असल्याचं समोर आलंय. आतापर्यंत झालेल्या अपघाताच्या वेळा पाहिल्यास, सर्वाधिक अपघात हे रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या सुमारास झाल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे.

'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?.
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?.
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल.
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?.
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!.
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.