पायलट नागपूरवरुन पुणे विमान उड्डाणासाठी जात होता, बोर्डिंग गेटवर बेशुद्ध पडला

Indigo pilot death at airport : नागपूरवरुन पुणे शहरात विमान घेऊन येण्यासाठी पायलट निघाला होता. विमानतळाच्या बोर्डिंग गेटवर तो आला. परंतु गेटवरच बेशुद्ध पडला. त्याला लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पायलट नागपूरवरुन पुणे विमान उड्डाणासाठी जात होता, बोर्डिंग गेटवर बेशुद्ध पडला
Follow us
| Updated on: Aug 18, 2023 | 11:23 AM

पुणे, नागपूर | 18 ऑगस्ट 2023 : नागपूर विमानतळावरुन पुणे शहराकडे येणारे विमान तयार झाले होते. प्रवाशी विमानात बसण्यासाठी निघाले होते. विमानाचा पालयट आला होता. पायलट विमानतळाच्या बोर्डिंग गेटवर पोहचला अन् खाली कोसळला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे धावपळ उडाली. तातडीने त्या पायलटला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्रथमदर्शनी मृत्यूचे कारण ह्रदयविकार म्हटले गेले.

कसा घडला प्रकार

इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅप्टन मनोज सुब्रमण्यम गुरुवारी नेहमीप्रमाणे कामावर आले होते. त्यांच्यावर नागपूर- पुणे या फ्लॅईटची जबाबदारी होती. वैमानिक नागपूरवरुन पुणे शहराला विमान घेऊन जाण्यासाठी तयार झाले होते. विमान बोर्ड होण्यापूर्वी ते बोर्डिंग गेटजवळ कोसळले. विमानतळावरील ग्राउंड स्टाफच्या मदतीने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

रुग्णालयातील सूत्रांनी काय दिली माहिती

रुग्णालयातील सूत्रांनी मनोज सुब्रमण्यम यांच्या मृत्यूचे कारण ह्रदयविकार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. यासंदर्भात रुग्णालयाचे प्रवक्ते एजाज शमी म्हणाले की, सुब्रमण्यम यांचा मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालानंतर समोर येणार आहे.

हे सुद्धा वाचा

कंपनीने काय म्हटले

दरम्यान वैमानिक मनोज सुब्रमण्यम यांच्या मृत्यूसंदर्भात इंडिगो कंपनीने दु:ख व्यक्त केले आहे. आमच्या संवेदना त्यांच्या परिवारासोबत असल्याचे इंडिगो प्रवक्ताने म्हटले आहे. रुग्णालयात नेताना मनोज सुब्रमण्यम यांचा मृत्यू झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

आठवड्याभरात तिसरा प्रकार

पायलटचा अचानक मृत्यू झाल्याचा हा आठवड्यातील तिसरा प्रकार आहे. त्यामध्ये दोन भारतीय पायलट आहे. यापूर्वी दिल्लीवरुन दोहा जणाऱ्या कतर एअरवेजचा वैमानिकाचा मागील आठवड्यात मृत्यू झाला होता. पायलटचा अचानक मृत्यू होण्याच्या प्रकारामुळे चिंता निर्माण झाली आहे. तसेच वैमानिकांची नियमित आरोग्य तपासणी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

दरम्यान आठवड्याभरीत तिसऱ्या वैमानिकाचा अचानक मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे नागरी विमानन मंत्रालयकडून काही मार्गदर्शक सूचना विमान कंपन्यांना दिल्या जाण्याची शक्यता आहे.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.