पंतप्रधान मोदी म्हणाले, खूप हसा, फिट राहा, विद्यार्थी हसताच मोदी लगेच काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित सिम्बॉयसिस इंटरनॅशन विद्यापीठाचा सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केलं.
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narnendra Modi) आज पुणे (Pune) दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित सिम्बॉयसिस (Symbiosis) इंटरनॅशन विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केलं. तुम्ही संधीचा फायदा घ्या. तुमचे स्टार्टअप सुरू करा. देशातील समस्यांचे समाधान विद्यापीठातून निघाले पाहिजे. तरुणांच्या डोक्यातून यायाला हव्यात. जसं स्वतसाठी गोल्स सेट करता तसे काही गोल्स देशासाठीही सेट करा, असं नरेंद्र मोदी म्हणाले. टेक्निकल फिल्डमध्ये असाल तर देशातील नागरिकांना उपयोगी पडेल असे टेक्निकल गोष्टी विकसित करा. ग्रामीण भागाला फायदेशीर होतील अशा गोष्टी करा. हेल्थ सेक्टरमध्ये असाल तर हेल्थ सेक्टर मजबूत करण्यावर भर द्या, असं मोदी म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना फिटनेसची काळजी घ्या, असं सांगितलं. खूप हासा आता नाही नंतर जोक्स मारा खूप, खूप फिट राहा हासा देशाला उंचावर घेऊन जा. जेव्हा आपले गोल्स पर्सनल ग्रोथ वरून नॅशनल ग्रोथशी संलग्न होतात तेव्हा राष्ट्र निर्मितीत स्वयंच्या भागीदाराचा अनुभव येतो, असं नरेंद्र मोदी म्हणाला.
लोकांच्या समस्या जाणून घ्या
तुमच्या थीम तयार करा. महिन्यासाठीच्या करा. वर्षाच्या करा. उदाहरण ग्लोबल वॉर्मिंग हा विषय आहे. त्यावरच काम करा. कार्टुन बनवा, परिषदा घ्या, चर्चा सत्रं करा, संशोधन करा, कविता करा असं काही करा. मी सांगतो तीच थीम घ्या असं नाही. दुसरी घ्या. आपल्या गावाच्या सीमेचा विकास कसा करता येतील. त्या ठिकाणी जाऊन लोकांच्या समस्या समजून घ्या आणि त्यावर तोडगा काढा. असं काही करा. एक भारत श्रेष्ठ भारतचं स्वप्न साकार झाल्यावर वसुधैव कुटुंबकमचं काम पूर्ण होतं.
तुमच्या कल्पना पंतप्रधान कार्यालयाला पाठवा
इतर विद्यापीठातून आलेल्या विद्यार्थ्यांची भाषा शिकून घ्या, इथून बाहेर पडताना मराठीसहीत भारतातील इतर पाच भाषेचे 100 शब्द त्याला माहीत असावी अशी तयारी करा. आपल्या स्वातंत्र्याचा इतिहास डिजीटल स्वरुपात आणा. त्यावरही काम करू शकता. वॉटर सेक्युरिटी, अॅग्रीकल्चरल टेक्नॉलॉजीला जोडण्याचा विषय असो अनेक विषयावर तुम्ही संशोधन करू शकता. ते विषय कोणते असतील ते तुम्ही ठरवा. पण देशातील आवश्यकता लक्षात घेऊन तुम्ही विषय निवडा. या थीमवर काम केल्यावर तुम्ही तुमचे अनुभव, सल्ला कल्पना पंतप्रधान कार्यालयाला पाठवा, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं.
इतर बातम्या: