“ही परंपरा महाराष्ट्रात कधी नव्हती”; राष्ट्रवादीच्या आमदाराने भाजपची संस्कृती दाखवून दिली..
सुनील शेळके यांनी भाजपने पोटनिवडणुकीसाठी इतर पक्षांच्या आधीपासून या ठिकाणी तयारी केली होती असा आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
पिंपरी/चिंचवड: चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला असताना राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्याने या पोटनिवडणुकीमध्ये आता आणखी चुरस वाढली आहे. राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिका व्यक्त केल्या गेल्याने आता राजकीय पक्षामध्येच जोरदार वादावादी सुरू झाली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे.
भारतीय जनता पक्षावर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी गंभीर आरोप केले आहे.
भाजपचा आमदार गेला की सहानुभूती, आणि राष्ट्रवादीचा आमदार गेला की सहानुभूती बाजूला ठेवायची, ही परंपरा महाराष्ट्रात कधीच नव्हती असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
भारतीय जनता पक्षावर टीका करताना राष्ट्रवादीच्या सुनील शेळके यांनी भाजपनी महाराष्ट्रात वेगली संस्कृती आणली आहे.
त्यामुळे राजकीय संस्कृती बदलली असल्याची टीकाही त्यांच्यावर करण्यात आली आहे. हल्लीच्या राजकारणात सहानुभूतीचा विचार भाजपाला करायचा होता तर मागच्या तीन महिन्यापासून चिंचवड विधानसभेची तयारी कशासाठी करत होता? असा सवाल सुनील शेळके यांनी उपस्थित केला आहे.
या परिसरातील बुथ, वार्ड, इथले शहराध्यक्ष यांच्या बैठका घेऊन भाजपने पूर्वतयारी का? केली याचे भाजपाने उत्तर द्यावे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केला आहे.
आमदार सुनील शेळके यांनी गंभीर आरोप केल्यामुळे आता पोटनिवडणुकीच्या राजकारण आणखी तापणार असल्याची चिन्हं दिसत आहेत.
सुनील शेळके यांनी भाजपने पोटनिवडणुकीसाठी इतर पक्षांच्या आधीपासून या ठिकाणी तयारी केली होती असा आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
महाविकास आघाडीकडून उमेदवारी कोणाला द्यायची हा सर्वस्वी निर्णय पक्षश्रेष्ठीचा आहे. परंतु, ही जागा राष्ट्रवादीला मिळावी हा आमचा आग्रह असल्याचेही त्यांनी सांगितले.