‘बंडखोरीचा फटका बसला’, पराभवानंतर राष्ट्रवादीच्या नाना काटे यांची पहिली प्रतिक्रिया

चिंचवड पोटनिवडणुकीत (Chinchwad by-election) पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे (Nana Kate) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपल्याला बंडकोरीचा फटका बसल्याचं मत मांडलं.

'बंडखोरीचा फटका बसला', पराभवानंतर राष्ट्रवादीच्या नाना काटे यांची पहिली प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 7:21 PM

पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीत (Chinchwad By-Election Result) भाजप उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांचा विजय झालाय. तर महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे (Nana Kate) यांचा पराभव झालाय. तसेच अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांचादेखील पराभव झालाय. भाजपच्या विजयी उमेदवार अश्विनी जगताप यांना या पोटनिवडणुकीत 1 लाख 35 हजार 494 मतं मिळाली. तर नाना काटे यांना 99 हजार 424 मतं मिळाली. दुसरीकडे राहुल कलाटे यांनी 40 हजार 75 मत मिळाली. या पोटनिवडणुकीत राहुल कलाटे यांनी मविआ नेत्यांच्या आग्रहानंतर उमेदवारी अर्ज मागे घेतला असता तर आज चित्र वेगळं असतं. हीच उद्विग्नता नाना काटे यांनीही ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया देताना व्यक्त केलीय.

चिंचडवड पोटनिवडणुकीतील पराभवावर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिलीय. चिंचवडमध्ये बंडखोरीचा फटका बसल्याचं ते म्हणाले आहेत. “सगळे कार्यकर्ते प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचले. अतिशय चांगल्या पद्धतीने प्रचार झालेला. बंडखोरीचा नक्कीच फटका बसलेला आहे. कारण ते मतदान देखील आमचंच आहे. त्यामध्ये काही वंचितचं देखील मतदान असू शकतं. ते मतदानदेखील महाविकास आघाडीचं आहे”, असं नाना काटे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘त्यांनी मोठ्या प्रमाणात पैशांचं वाटप केलं’

“मतदानाचा आधी त्यांनी पूर्ण पोलिसांचं बळ वापरुन आमचे बरेच कार्यकर्ते उचलले होते. याशिवाय त्यांनी मोठ्या प्रमाणात पैशांचं वाटप केलं होतं. पैशांचा वापर अतिशय जास्त प्रमाणात झालाय”, असा दावा नाना काटे यांनी केला. “ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मतदारांपर्यंत जात होते पुन्हा त्याच पद्धतीने संपूर्ण चिंचवड मतदारसंघात काम करतील. आम्ही पुन्हा एकदा जोमाने काम करु”, असंदेखील ते यावेळी म्हणाले.

यावेळी भाजप उमेदवाराच्या विजयामागे त्यांना मिळालेली सहानुभूती हे कारण आहे का? असा प्रश्न विचारला असता नाना काटे यांनी नाही असं उत्तर दिलं. “भाजप उमेदवारांना सहानुभूती असती तर त्यांनी पैसे वाटले नसते. सहानुभूतीचा विषय राहिलाच नव्हता. त्यामुळे त्यांना पराभवाची भीती वाटत होती”, असा दावा नाना काटे यांनी केला.

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.