शरद पवार यांच्या भेटीसंदर्भात प्रकाश आंबडेकर यांनी उघड केलं गुपित
sharad pawar and prakash ambedkar meeting | सध्यातरी आमच्यासाठी इंडिया आघाडीची दारे बंद आहेत. आम्हाला इंडिया आघाडीत घेण्यास कोणाचा विरोध आहे, हे माहीत नाही. परंतु इंडिया आघाडीमध्ये आमचा समावेश कधी होणार आहे हे त्यांनीच ठरवायचे आहे. शरद पवार यांच्या भेटीवर प्रकाश आंबेडकर यांनी मत मांडले.
योगेश बोरसे, पुणे, दि. 1 जानेवारी 2024 | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांचे भांडण सर्वांना माहीत आहे. दोन्ही नेत्यांनी अनेकवेळा एकमेकांविरोधात प्रतिक्रिया दिल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून वंचित आघाडीसोबत युतीची घोषणा झाली होती. त्यावेळी महाविकास आघाडीत वंचितला प्रवेश देण्यास शरद पवार यांनी विरोध केल्याचे म्हटले जाते. परंतु या घटनेनंतर आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर वंचित संदर्भात शरद पवार यांनी भूमिका बदलली आहे. आता वंचितसोबत आघाडीची चर्चा सुरु झाली आहे. यासंदर्भात पुणे येथील शरद पवार यांच्या मोदी बागेत बैठक झाल्याची चर्चा होती. त्या चर्चांना पूर्णविराम देण्याचे काम प्रकाश आंबडेकर यांनी दिले आहे. त्यांनी भेट झाल्याचे मान्य केले आहे.
काय म्हणाले प्रकाश आंबडेकर
प्रकाश आंबेडकर यांचे शरद पवार यांची भेट घेतली का? या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर दिले आहे. आता आम्ही एकत्र येणारच आहोत. त्यामुळे भेटीघाटी होत राहणार आहेत. एखाद्या भेटीविषयी तर्तवितर्क करायला नको. आम्ही एकत्र येणार आहोत. त्यामध्ये शिवसेनेसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्यामुळे यापुढेही शरद पवार यांचीही भेटी आणि बैठका होत राहणार आहे. शरद पवार राहत असलेल्या मोदी बागेमध्ये माझ्या दोन बहिणी राहतात. त्यांना भेटण्यासाठी मी मोदी बागेमध्ये आलो होतो, असे रविवारी प्रकाश आंबडेकर यांनी म्हटले होते. त्यानंतर सोमवारी भेटीची कबुली दिली.
इंडिया आघाडीत जाणार का?
प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी इंडिया आघाडीत जाणार का? या प्रश्नावर बोलताना प्रकाश आंबडेकर म्हणतात, सध्यातरी आमच्यासाठी इंडिया आघाडीची दारे बंद आहेत. आम्हाला इंडिया आघाडीत घेण्यास कोणाचा विरोध आहे, हे माहीत नाही. परंतु इंडिया आघाडीमध्ये आमचा समावेश कधी होणार आहे हे त्यांनीच ठरवायचे आहे. ज्या दिवशी आम्ही इंडिया आघाडीत सहभागी झालो तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांत देशाला कसे खोकले केले, याचा आरखडा मांडणार आहे.
प्रकाश आंबेडकर यांना नवीन वर्षाच्या संकल्पाबाबत विचारलं असता ते म्हणाले की, सत्तेत येणे, संविधान वाचवणे, तसेच राज्याची शांतता हे आमचं यावर्षी च संकल्प असणार असल्याचं यावेळी आंबेडकर यांनी सांगितले. राज्याच्या बाहेर आत्ता प्रकल्प जात आहे. याबाबत आंबेडकर यांना विचारलं असता ते म्हणाले की, या देशाच्या पंतप्रधान यांनी गेल्या 10 वर्षात देशाला कस खोकल केलं आहे. त्याचा एक आराखडा मांडण्यात येणार आहे.