AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“उपमुख्यमंत्री कार्यालयातून निमंत्रण, पण महापौरांनी काकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं”, निमंत्रणाच्या वादावर राष्ट्रवादीकडून खुलासा

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयात पुण्यातील प्रश्नांसाठी आयोजित बैठकीला आपल्याला आमंत्रण मिळाला नसल्याचा आरोप महापौर आणि भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी केला. या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्युत्तर दिलंय.

उपमुख्यमंत्री कार्यालयातून निमंत्रण, पण महापौरांनी काकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं, निमंत्रणाच्या वादावर राष्ट्रवादीकडून खुलासा
Ajit Pawar Murlidhar Mohol
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 6:08 PM

पुणे : मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयात पुण्यातील प्रश्नांसाठी आयोजित बैठकीला आपल्याला आमंत्रण मिळाला नसल्याचा आरोप महापौर आणि भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी केला. तसेच असं करुन पुणेकरांचा डावलल्याचं मत व्यक्त केलं. या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्युत्तर दिलंय. “मोहोळ यांना या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री कार्यालयातून रितसर निमंत्रण देण्यात आलं. आमदार सुनील टिंगरे यांनी स्वतः फोन करुन त्यांना निमंत्रण दिलं. मात्र, त्यांनी आपल्या घरी काकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं,” असा दावा राष्ट्रवादीने केलाय. त्यामुळे या मानअपमानाच्या वादात नेमकं कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं असा प्रश्न पुणेकरांसमोर उभा राहिलाय (NCP clarify on allegation by Pune Mayor Murlidhar Mohol about invitation).

पुणे महापालिका विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ म्हणाल्या, “महापौर यांच्या घरी त्यांच्या काकांची मृत्यू झाला. त्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांना निमंत्रण होतं मात्र ते या कारणामुळे येऊ शकले नाहीत. या बैठकीत पुण्याच्या विकासाबाबत प्रश्न मांडले गेले. महापौरांनी याबाबत काही गैरसमज करून घेऊ नये असं मला वाटतं. उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून महापौरांना रीतसर निमंत्रण दिलं होतं. आमचे सहकारी आमदार सुनील टिंगरे यांनी स्वतः फोन केला होता. महापौरांच्या घरी दुर्देवी प्रकार घडल्याने व्हीसीमध्ये सुद्धा उपस्थित राहू शकत नाही असे त्यांनी आमच्या आमदारांना सांगितलं. ” या बैठकीला हडपसर आमदार चेतन तुपे, वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे देखील उपस्थित होते.

“असं बोलून सुद्धा त्यांनी आता हे ट्विट काय केलं याबाबत मला काही सांगता येणार नाही. परंतु त्यांना उपमुख्यमंत्री कार्यालयातून सुद्धा निरोप गेला होता. उपमुख्यमंत्री यांना सुद्धा आम्ही याबाबत बैठकीदरम्यान माहिती दिली. मीटिंग अडीच वाजता होती. त्याआधीच आमदारांनी महापौरांना फोन केला होता आणि त्यात त्यांनी हे कारण सांगितलं. वेळेत महापौरांना निमंत्रण गेलं होतं. सर्व अधिकारी, आयुक्त, आमदार सगळे बैठकीला उपस्थित होते,” अशी माहिती राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे आणि सुनील टिंगरे यांनी दिली.

बैठकीत नेमकी काय चर्चा?

या बैठकीत माडा कॉलनीच्या पुनर्वसनाचा प्रश्न तो मार्गी लावण्यासाठी निर्णय घेण्यात आला. अंबिल ओढा आणि इतर वसाहतीबाबत कोर्टाने निर्णय दिले होते. यामध्ये ओढ्याच्या भिंती बाबत काय करावे याबाबत सुद्धा निर्णय झाला. वसाहतींना वाचवण्यासाठी त्याच्या आतमध्ये पूर जाऊ नये म्हणून भिंती बांधायचा निर्णय आज अजित पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.

महापौर मुरलीधर यांचा नेमका आरोप काय?

मुरलीधर मोहोळ म्हणाले, “महापौर म्हणून मंत्रालयात पुण्याच्या प्रश्नांसंदर्भात होणाऱ्या बैठकीचं निमंत्रण आपल्याला नाही, हे व्यक्तिशः मलाच नाही, तर पुणेकरांना डावलल्यासारखं आहे. कोरोना संकटाशी सामना करताना शहराचं हित लक्षात घेऊन आणि राज्य सरकारची भरीव मदत महापालिकेला नसतानाही आपण कधीही राजकारण केलं नाही. उलट मी कोरोनाबाधित असल्याचा काळ वगळता जवळपास सर्वच बैठकांना उपस्थित राहून आणि समन्वय ठेऊन पुढे जात राहिलो. मात्र या महत्त्वाच्या बैठकीलाच आपल्याला जाणीवपूर्वक सहभागी करुन न घेणे, हे पुणेकर चांगलंच लक्षात ठेवतील. कारण पुणेकर सुज्ञ आणि स्वाभिमानी आहेत.

“गेल्या चार वर्षांत झालेली पुणे शहरात झालेली विकासाची कामे आणि सुरु असलेल्या मोठ्या प्रकल्पाची माहिती समस्त पुणेकरांना आहे. मात्र आपल्याला डावलून का होईना पण शहराच्या प्रश्नांसंदर्भात बैठक होतेय, याचं स्वागतच,” असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितलं.

हेही वाचा :

‘ही’ गोष्ट पुणेकर नेहमी लक्षात ठेवतील, महापौरांचा राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा

पुणेकरांनो पाणी जपून वापरा, ‘या’ दिवशी पाणी पुरवठा बंद, महापालिकेकडून सूचना जारी

तेव्हा महापौर झोपले होते का? आंबिल ओढा तोडक कारवाई प्रकरणी नितीन राऊत संतापले

व्हिडीओ पाहा :

NCP clarify on allegation by Pune Mayor Murlidhar Mohol about invitation

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.