“अजितदादा, चिकनची दुकाने दिवसभर सुरु ठेवा”, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदाराचं पत्र
चिकन दुकानं दिवसभर सुरु ठेवण्याबाबत अजित पवारांनी लक्ष घालावं, अशी मागणी रमेश थोरात यांनी केली आहे. Ajit Pawar Ramesh Thorat
पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश थोरात यांनी चिकन व अंडयाची दुकाने दिवसभर सुरु ठेवावीत, अशी मागणी केलीय. दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरु ठेवल्यास कोरोनाग्रस्तांना चिकन तरी नीट खाता येईल, अशी भावना पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित नागरिकांच्या नातेवाईकांची आहे. चिकन दुकानं दिवसभर सुरु ठेवण्याबाबत अजित पवारांनी लक्ष घालावं, अशी मागणी रमेश थोरात यांनी केली आहे. (NCP ex MLA Ramesh Thorat demaned to Ajit Pawar gave permission to open Chicken Shop whole day)
चिकनची दुकानं दिवसभर सुरु ठेवण्याची मागणी का?
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना त्यांना पौष्टिक आहार मिळणे गरजेचे आहे. राज्य सरकारच्या शनिवारी रविवारी जारी केलेल्या वीकेंड लॉकडाऊनमुळे चिकन व अंडी दुकाने बंद ठेवावी लागत आहेत. यामुळे या दोन दिवशी कोरोना रुग्णांना चिकन आणि अंडी मिळत नाहीत. तरी याबाबत पुणे जिल्हाधिकारी यांनी या दोन दिवशी सुद्धा दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्याची गरज आहे. चिकन दुकानांच्या प्रश्नी पुण्याचे पालकमंत्री या नात्यानं अजित पवारांनी लक्ष घालावे, अशी मागणी माजी आमदार रमेश थोरात आणि राज्यस्तरीय पोल्ट्री असोसिएशन यांनी केली आहे.
राज्यस्तरीय पोल्ट्री असोसिएशनचं निवेदन
चिकन दुकानं शनिवार आणि रविवारसह दिवसभर सुरु ठेवण्याबाबत राज्यस्तरीय पोल्ट्री असोसिएशननं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिलं आहे. पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार रमेश थोरात यांनी अजित पवार यांची भेट घेऊन या विषयी निवेदन देऊन सकारात्मक चर्चा केली आहे.
जे रुग्ण बाधित झाले आहेत त्यांना सकस व पौष्टिक आहार देण्यावर भर दिला जात असून रुग्ण लवकर बरा व्हावा म्हणून अंडी आणि चिकन खाण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. परंतु या दोन दिवशी दुकाने बंद असल्याने त्यांची गैरसोय होताना दिसत आहे. खासकरून ग्रामीण भागात दोन तीन दिवसांचे फ्रोझन चिकन खाणे म्हणजे शिळे चिकन खाणे असा गैरसमज आहे. त्यामुळे रोज दुकानात जाऊन ताजे चिकन खाण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी चिकन दुकानांना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी कोरोना रुग्णांचे नातेवाईक करू लागले आहेत.
फळभाज्या, रानभाज्या उत्पन्न वाढीसाठी प्रोत्साहन, 2021-22 हे वर्ष “उत्पादकता वर्ष”: दादाजी भुसेhttps://t.co/nnMi4u4mLi#DadajiBhuse | #maharashtra | #corona | #Palghar
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 1, 2021
संबंधित बातम्या:
रावसाहेब दानवेंचं वक्तव्य तथ्यहीन, केंद्रानं हटवादी भूमिका सोडावी- अजित पवार
सरकारं येत असतात, जात असतात; सूडबुद्धीने कोणी काही करू नयेः अजित पवार
(NCP ex MLA demanded to Ajit Pawar gave permission to open Chicken Shop whole day)