कार्यकर्ते म्हणाले, ‘अजितदादा आगे बढो…’; अजित पवार म्हणतात, अजून किती पुढं जाऊ?

पल्या बिनधास्त विधानांमुळे जसे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांच्या मिष्किल स्वभावाबाबतही प्रसिद्ध आहेत. त्याचं प्रत्यंत्तर आज आंबेगावात पाहायला मिळालं. (ajit pawar)

कार्यकर्ते म्हणाले, 'अजितदादा आगे बढो...'; अजित पवार म्हणतात, अजून किती पुढं जाऊ?
ajit pawar
Follow us
| Updated on: Oct 15, 2021 | 5:56 PM

पुणे: आपल्या बिनधास्त विधानांमुळे जसे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांच्या मिष्किल स्वभावाबाबतही प्रसिद्ध आहेत. त्याचं प्रत्यंत्तर आज आंबेगावात पाहायला मिळालं. आंबेगवात अजितदादा एका कार्यक्रमाला आल्यावर कार्यकर्त्यांनी जोरजोरात घोषणा देण्यास सुरुवात केली. अजितदादा आगे बढो…च्या घोषणांनी संपूर्ण परिसर कार्यकर्त्यांनी दणाणून सोडलं. त्यावर अरे अजून किती पुढे जाऊ? असं अजितदादांनी म्हणताच एकच हशा पिकला.

आंबेगावत अजित पवार बोलत होते. भाषण सुरू होताच लोकांमधून अजितदादा आगे बढो असा आवाज आला. त्यानंतर अजून किती पुढं जाऊ? असं अजितदादांनी म्हणताच एकच हशा पिकला. त्यानंतर अजित पवार यांनी आपल्या नर्मविनोदी शैलीत भाषणाला सुरुवात केली. मी बरेच दिवस ह्या भागात आलो नव्हतो. दिलीप वळसे पाटील म्हणाले या म्हणून आलो. कोरोनामुळे जग थांबलं होतं. त्यात शेतकऱ्यांनी तारलं नसतं तर अवघड झालं असत. गेल्या वेळी सत्तेत नव्हतो. काही ठिकाणी आमची लोक होती. त्यावेळी तिथं काही निधी कमी पडल्यामुळे विकास झाला नाही तो भरून काढायचा आहे. काही राजकीय गणित वेगळी घडली. शरद पवार, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे हे वेगवेगळ्या विचारधारेच लोक एकत्र आली आणि महाविकास आघाडीच सरकार आलं, असं अजितदादा म्हणाले.

बाबांनो, लस टोचून घ्या

आजही कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. त्याचा फायदा जिल्हा आणि राज्याने घ्यावा. काहीं काही लोकांना वाटत आता सर्व वातावरण शांत झालं. लस टोचून घ्यायची काही गरज नाही असं काहींना वाटतं. पण बाबांनो लस टोचून घ्या, असं ते म्हणाले.

शाळेत इंग्रजीचे शिक्षक मोजकेच

मी आदिवासी इंग्लिश मीडियम स्कूलचं उद्घाटन केलं. तिथं विचारलं किती शिक्षक इंग्रजी माध्यमातून शिकले आहेत. तर फक्त काही शिक्षक असल्याचं सांगितलं गेलं. या शाळेत प्राथमिक शिक्षणापासून ते शेवटपर्यंत इंग्रजी माध्यमातून शिकवलं पाहिजे असं त्यांना सांगितलं, असंही ते म्हणाले.

म्हणून जयंतरावांनी गृहमंत्रीपद नाकारलं

आज राज्याच्या गृह विभागाची जबाबदारी दिलीप वळसे पाटलांकडे आहे. त्यामुळे अतिशय बारकाईने लक्ष ठेवावे लागते. कायदा-सुव्यवस्था कशी व्यवस्थित राहील, कुठे ही कसा कुणावर अन्याय होणार नाही त्यामुळे पार डोळ्यात तेल घालून ते पाहावे लागते. आर आर पाटील हे कशापद्धतीने मंत्रीपद सांभाळत होते हे मी पाहिलं आहे. एक वर्ष जयंत पाटलांनी गृहमंत्रीपद संभाळल. मी जयंत पाटलांना म्हणालो होतो यावेळेस पण तुम्ही गृहमंत्रीपद घ्याय. मागील वर्षी एकच वर्ष संभाळलं होत. ते म्हणाले घेतलं की, माझा बीपी सुरू झाला आहे. त्यामुळे मला बीपीच्या गोळ्या घ्यावा लागतात, असं सांगून त्यांनी गृहमंत्रीपद घेण्यास नकार दिला, असं त्यांनी सांगितलं.

खेडमध्ये सामंजस्याने घ्या

खेड सभापती, उपसभापती पदाच्या बातम्या समोर आल्या. वादाच्यावेळी सर्वांनीच सामंजस्यपणाची भूमिका घेतली पाहिजे. काही जणांचा एकदम हट्टी आणि टोकाचा स्वभाव असतो. काही वेळेस पक्षाचे वरिष्ठ नेते येऊन स्टेटमेंट करतात. त्यामुळे तिथल्या स्थानिकांच्या भावना दुखावल्या जातात. भांड्याला भांडं लागतं. त्यातून मार्ग काढण्याचं काम सर्वांनी केलं पाहिजे. काही ठिकाणी आम्ही दोन पावलं मागे सरलं पाहिजे. काही ठिकाणी त्यांनी दोन पावलं मागे सरकली पाहिजे. असं करून त्यामध्ये मार्ग निघाला पाहिजे हीच भूमिका राज्याचे मुख्यमंत्री देखील व्यक्त करतात, असं त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

Dussehra 2021 Live Updates | जर वेळ आली तर तुमच्यावरुन जीवही ओवाळून टाकेन – पंकजा मुंडे

गोपीनाथ मुंडेला जात नव्हती, तो नसता तर हा महादेव जानकर मेंढरं राखायला गेला असता; जानकरांचं तडाखेबंद भाषण

Maharashtra News LIVE Update | किरीट सोमय्यांकडून भ्रष्टाचाराच्या रावणाचं दहन

(ncp leader address party program at pune)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.