Ajit Pawar : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात नवा ट्विस्ट; आरोपपत्रात अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचं नावच नाही; ईडीची क्लीनचिट?

महारष्ट्र राज्य बँक घोटाळ्यात अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित कंपनीचं नाव आलं होतं. ईडीने या कंपनीला आरोपी करून तिच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. मात्र, आरोपपत्रात अजित पवार आणि त्यांच्या पत्नीचं नावच नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Ajit Pawar : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात नवा ट्विस्ट; आरोपपत्रात अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचं नावच नाही; ईडीची क्लीनचिट?
ajit pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 12, 2023 | 8:47 AM

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने जरंडेश्वर साखर कारखान्याची 65.75 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. या घोटाळ्यात एका कंपनीचेही नाव होते. ही कंपनी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित आहे. ईडीने आता अजित पवारांशी संबंधित या कंपनीला आरोपी बनवलं आहे. कंपनीच्या विरोधात आरोपपत्रही दाखल केलं आहे. हे पुरवणी आरोपपत्र आहे. मात्र, त्यात अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा साधा उल्लेखही नाहीये. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अजित पवार यांना ईडीने क्लीनचिट दिली की काय? अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी ईडीने पुरवणी आरोपपत्रं दाखल केलं आहे. या घोटाळ्याप्रकरणी जरंडेश्वर साखर कारखान्याची 65.75 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. 2021मध्ये ही कारवाई करण्यात आली होती. या घोटाळ्यात स्पार्कलिंग सॉइल लिमिटेड या कंपनीचं नाव आलं होतं. ही कंपनी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असल्याचं सांगितलं जात होतं. पण ईडीने या प्रकरणी अजित पवार यांची एकदाही चौकशी केली नाही. अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना साधं समन्सही बजावलं नाही. आता ईडीने स्पार्कलिंग सॉइल कंपनीला आरोपी बनवलं आहे. या कंपनीविरोधात ईडीने पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. पण अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांचा या आरोपपत्रात साधा उल्लेखही नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

19 तारखेला सुनावणी

या प्रकरणाची येत्या 19 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. त्यावेळी कोर्ट काय प्रश्न करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. गरज पडल्यास आम्ही पुन्हा पुरवणी आरोपपत्र दाखल करू, असं ईडीचं म्हणणं आहे. त्यामुळे पुढील आरोपपत्रात अजित पवार यांचं नाव येणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काय आहे प्रकरण?

ईडीच्या आर्थिक गुन्हे शाखेने 2019मध्ये दाखल झालेल्या एका प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या अँगलने चौकशी सुरू केली होती. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने सरफेसी कायद्याचं पालन न करता एक साखर कारखाना कमी किमतीत आपल्या नातेवाईक आणि मित्रांना विकला होता. हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आणि ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाण्याला 2010मध्ये गुरु कमोडिटी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडला 65.75 कोटी रुपयाला विकल्याचं या चौकशीतून निष्पन्न झालं होतं.

कारखाना खरेदी केल्यानंतर या कंपनीने तात्काळ हा कारखाना लीजवर दिला होता. यात अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्या स्पार्कलिंग सॉईल कंपनीची अधिक भागीदारी असल्याचं आढळून आलं होतं. जेव्हा ही डील झाली तेव्हा अजित पवार महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे चेअरमन होते. आपल्याच कंपनीला साखर कारखाना लीजवर देण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्याप्रकरणीच हे आरोपपत्रं दाखल करण्यात आलं आहे.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.