Ajit Pawar : अजित पवार यांनी हाती घेतले धनुष्यबाण, अन्…

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार रविवारी सकाळी बारामतीत होते. यावेळी त्यांनी धनुष्यबाण हातात गेले अन् अचूक नेम साधला. हा नेम राजकीय नव्हता तर लक्ष्यावर होता. यामुळे अजित पवार यांच्या एकाग्रतेचे कौतूक होत आहे.

Ajit Pawar : अजित पवार यांनी हाती घेतले धनुष्यबाण, अन्...
Follow us
| Updated on: Jun 18, 2023 | 12:03 PM

नाविद पठाण, बारामती, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अन् राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अजित पवार रविवारी बारामती दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी सकाळी ६ वाजता पहिल्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यानंतर कन्हेरीत सुरु असलेल्या वन उद्यानाची पाहणी केली. विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात नेहमीप्रमाणे अजित पवार यांच्या जनता दरबाराचं आयोजन केले होते. बारामतीमधील विविध कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली.

अजित पवार यांनी धुनष्यच हाती घेतले

विरोधी पक्ष नेते अजित पवार रविवारी बारामतीच्या दौऱ्यावर असताना एन्व्हायरमेंट फॉर्म ऑफ इंडिया संस्थेचा कार्यक्रम होता. या संस्थेने आयोजित केलेल्या हॅपी स्ट्रीट कार्यक्रमास अजित पवार यांनी हजेरी लावली. या ठिकाणी विविध खेळांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी अजित पवार यांनी धनुष्यबाण हातात घेऊन अचूक निशाणा साधला. राजकीय क्षेत्रात नेहमी अचूक नेम धरणारे अजित पवार प्रत्यक्ष धनुष्यबाण हातात घेऊन अचूक निशाणा साधला. धनुष्यबाणमधील नेम हा त्यांचा लक्ष्यावर होता. त्यामुळे त्यांच्या एकाग्रतेचेही कौतूक उपस्थितांनी केले.

बारामतीत एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाचा हॅप्पी स्ट्रीटस बारामती उपक्रमाचे उद्घाटन अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी हॅप्पी स्ट्रीटमध्ये विविध खेळांसह मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले अजित पवार

आपण बारामती बदलतोय.. तुम्ही सगळे साथ देताय. त्यामुळे ते शक्य होत आहे. बारामतीचं रुप पालटताना या रस्त्याचं काम हा पहिला प्रयोग आहे. तीन हत्ती चौक सुशोभिकरण काम सुरु आहे. सगळ्यांची साथ मिळाल्यामुळे आपण हे सर्व करु शकतोय. शासनाप्रमाणे नागरिकांचीही काही जबाबदारी आहे. स्वच्छता, झाडांचं संगोपन करणे आवश्यक आहे. झाडं लावून ती वाढवण्यावर भर द्या, चांगल्या आरोग्यासाठी व्यायामाची आवश्यकता आहे, यामुळे व्यायम नियमित करा.

बारामतीतील कामांमध्ये अदृश्य शक्ती

निसर्ग संवर्धनासाठी एन्व्हॉर्यमेंटल फोरमचं काम कौतुकास्पद आहे. बारामतीतील विकास कामांमध्ये अदृश्य शक्ती आहेत. अनेक हात यामागे राबत असतात. पाण्याचा प्रश्न असला तरी पाणी काटकसरीने वापरा. पाण्याच्या बाबतीत नियोजन केलंय. निसर्ग संवर्धनासाठी एन्व्हॉर्यमेंटल फोरमचं काम कौतुकास्पद आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.