‘बायकोने जेवढे किस घेतले नाही तेवेढे…’, अजित पवार यांची बारामतीत जोरदार फटकेबाजी

अजित पवार यांचं आज बारामतीकरांकडून जंगी स्वागत करण्यात आलं. बारामतीत आज अजित पवार यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. अजित पवार बारामतीकरांकडून करण्यात आलेलं स्वागत पाहून अक्षरश: भारावले.

'बायकोने जेवढे किस घेतले नाही तेवेढे...', अजित पवार यांची बारामतीत जोरदार फटकेबाजी
Follow us
| Updated on: Aug 26, 2023 | 10:16 PM

बारामती | 26 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादील काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीत जोरदार फटकेबाजी केली. अजित पवार हे आज मंत्रिपदाची शपत घेतल्यानंतर आद पहिल्यांदाच बारामतीत आले होते. यावेळी त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी त्यांचं बारामतीत जंगी स्वागत केलं. जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. हजारो नागरीक त्यांच्या मिरवणुकीत सहभागी झाले. बारामतीकरांकडून अजित पवारांना नागरी पुरस्कार देवून गौरविण्यात आलं. बारामतीकरांचं आणि कार्यकर्त्यांनी केलेलं स्वागत पाहून अजित पवार चांगलेच भारावले. यावेळी त्यांनी आपल्या शैलीत बारामतीकरांचे आभार मानले.

“बारामतमध्ये एन्ट्री केली आणि प्रचंड गर्दी, अशी गर्दी मी कधी बघितली नव्हती. एवढे माझे क्लासमेट भेटले, इतके जणं भेटली की मी पाहातच राहिलो. आया-बहिणी ओवाळत होत्या, तरुण मुलं-मुली प्रोत्साहन देत होते. शुभेच्छा देत होते. सर्व दुकानदार बाहेर आले होते. सर्व बारामती बाहेर आली होती”, असं अजित पवार म्हणाले.

“ग्रामीण, शहरी भाग बाहेर आले होते, अशाप्रकारची मिरवणूक मी माझ्या आयुष्यात कधी बघितली नव्हती. मीडियाही बघत होती. हे प्रेम आहे. ही काही कुणाला बळजबरी केलेली नव्हती. लोकांचा उत्साह, लोकांचं प्रेम, लोकांची आपुलकी होती. काय तो फुलांचा, पाकळ्यांचा सडा पडलो, असा सडा बारामतीच्या रस्त्यांनी कधी पाहिला नसेल”, असा अजित पवारांनी केला.

‘बायकोने एवढ्या किस घेतल्या नाही एवढ्या…’

“तुम्ही सगळे प्रतिसाद देत होता. एवढी ढकला-ढकली, रेटारेटी, आयु्ष्यात मला कुणी केली नाही. हातात हात द्यायचो, हात ओढायचे, असं वाटायचे हात तुटतील की काय, काही जण हातात हात घेताना मुके पण घ्यायचे, किसही घ्यायचे. आयला म्हटलं, बायकोने एवढ्या किस घेतल्या नाही एवढ्या किस. म्हटलं, आज काय चाललंय काय! पण ठरवलं होतं, आज चिडायचं नाही. गप्प बसायचं. सर्वांना हात जोडायचा”, असं अजित पवार म्हणाले.

“मला एवढ्या प्रकारच्या टोप्या आज घातल्या, अरे बापरे बाप. कुठलील घालोस्तोर दुसरी, तिसरी टोपी यायची. पण असं प्रेम, मला पुन्हा विचार करावा लागेल की, आता किती वाजता कामाला सुरुवात करायची आणि किती वाजता झोपायचं”, असं अजित पवार म्हणाले.

“मित्रांनो, प्रत्येकजण आई-वडिलांच्या पोटी जन्माला येतो आणि नियतीचं बोलावणं आल्यानंतर या जगातून निघून जातो. पण या जगात आल्यानंतर ज्या समाजाने आपल्याला घडवलेलं असतं, वाढवलेलं असतं, आपल्याला दिशा दिलेली असती, आपल्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिलेले असतात. त्यांचं हे प्रेम बघितल्यानंतर एक वेगळाच हुरुप येतो”, असं अजित पवार नागरिकांना संबोधित करताना म्हणाले.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.