हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत भर, ईडीने बँकेकडून मागवली माहिती

हसन मुश्रीफ यांच्यामागे ईडीचा ससेमिरा गेल्या काही दिवसांपासून लागला आहे. मागील महिन्यात हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील राहत्या घरी ईडी अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती.

हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत भर, ईडीने बँकेकडून मागवली माहिती
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 9:10 AM

भूषण पाटील, कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या अडचणी वाढणार आहेत. गेल्या पंधरा दिवसांपुर्वी अंमलबजावणी संचालयाने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील (Kolhapur District Bank) काही आजी माजी संचालकांची चौकशी केली होती. ईडीने (ed) जिल्हा बँकेतील पाच कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले होते. आता पुन्हा ईडीने बँकेकडून आजी-माजी संचालकांचे फोन नंबर मागवले आहे. २०१४ ते २०२१ या कालावधीत बँकेचे संचालक असणाऱ्यांचे फोन नंबर ईडीने मागवले आहे.

हसन मुश्रीफ यांच्यामागे ईडीचा ससेमिरा गेल्या काही दिवसांपासून लागला आहे. मागील महिन्यात हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील राहत्या घरी ईडी अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती. ईडी अधिकाऱ्यांनी त्यादिवशी तब्बल अकरा तास मुश्रीफांच्या कुटुंबियांची चौकशी केली होती. ईडी अधिकारी त्यावेळी काही महत्त्वाचे कागदपत्रे घरातून घेऊन गेले होते.

हे सुद्धा वाचा

फोन क्रमांक मागवले 

मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे ईडी अधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हा बँकेतही धाड टाकली. या धाडीदरम्यान ईडी अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतर थेट पाच कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले होते. आता ईडीने बँकेत संचालक असणाऱ्यांचे फोन क्रमांक मागवले आहे. २०१४ ते २०२१ या कालावधीत बँकेचे संचालक असणाऱ्यांचे फोन नंबर ईडीने मागवले आहे.  यामुळे हे सर्व संचालक चौकशीच्या फेऱ्यात येणार आहे.

कोणत्या प्रकरणात चौकशी

ब्रिक्स कंपनीला दिलेल्या कर्ज प्रकरणात तीन माजी संचालकांची चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीनंतर तिघांना ईडीने समन्स बजावले आहे. याच प्रकरणात इतर संचालकांची चौकशी होण्याची शक्यता आहे. या चौकशीनंतर हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत भर पडणार आहे.

मुलांच्या जमीनला विरोध

माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. कारण हसन मुश्रीफ यांच्या 3 मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली होती. यावर ईडीने त्यांच्या जामीन अर्जावर विरोध केला. अटकपूर्व जामीन दिला तर तपासावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे सांगत ईडीने विरोध केला.

विरोधकांवर ईडी आणि सीबीआयच्या धाडी टाकल्या जात असल्याचा आरोप काँग्रेस व राष्ट्रवादीकडून केला जात आहे. या आरोपांना भारतीय जनता पक्षाकडून कर नाही तर डर कशाला? असे सागंत उत्तर दिले जात आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.