Rupali Patil | बंडातात्या दारु पिऊन बोलले, राष्ट्रवादीच्या रुपाली पाटलांचं त्याच भाषेत उत्तर, आणखी काय बोलल्या?

कीर्तनकार बंडातात्या कराडकर  (Bandatatya Karadkar)यांनी वाईनचा विरोध करताना राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीका केली जात आहे.

Rupali Patil | बंडातात्या दारु पिऊन बोलले, राष्ट्रवादीच्या रुपाली पाटलांचं त्याच भाषेत उत्तर, आणखी काय बोलल्या?
rupali patil and bandatatya karadkar
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 11:16 AM

पुणे : कीर्तनकार बंडातात्या कराडकर  (Bandatatya Karadkar) यांनी वाईन विक्रीच्या परवानगीचा विरोध करताना राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. वेगवेगळ्या पक्षातील महिला नेत्यांनी तर कराडकर यांनी माफी मागावी अशी भूमिका घेतली आहे. दरम्यान, कराडकर यांनी माफी मागितलेली असली तरी या प्रकरणावर पडदा पडताना दिसत नाहीये. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी बंडातात्या कराडकर हे महिला नेत्यांविषयी बोलताना दारु पिऊन बोलत होते, असा गंभीर आरोप केला आहे. तसेच कराकडर यांनी माफी मागितली म्हणजे झालं का ? असा सवाल करत त्यांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे.

बंडातात्यांनी माफी मागितली म्हणजे संपलं का ?

बंडातात्या कराडकरांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर कोर्टातून गुन्हा दाखल करणार आहे. कोर्टातून 156 -3 नूसार गुन्हा दाखल करणार आहे. बंडातात्यांनी माफी मागितली म्हणजे संपलं का ? काल बंडातात्या दारू पिऊन बोलले, असं रुपली पाटील म्हणाल्या. आज पुण्यात कराडकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले जात आहे. कराडकर यांच्या पुतळ्याला जोडे मारुन त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला जाणार आहे.

सुप्रिया सुळे यांचं नाव घेताना तारतम्य बाळगायला हवं

याआधी रुपाली पाटील यांनी पुण्यात कराडकर यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. खडक पोलीस ठाण्यात त्यांनी तशी तक्रार दिलेली आहे. तसेच बंडातात्या वडीलधारी आहेत. त्यांनी बोलताना भान बाळगायला हवं. सुप्रिया सुळे या महिलांचे प्रश्न मांडणाऱ्या नेत्या आहेत. कोण दारू पिऊन पडतं यापेक्षा त्यांनी वाईनला विरोध करावा. मात्र सुप्रिया सुळे यांचं नाव घेताना तारतम्य बाळगायला हवं. मी या घटनेचा निषेध करते, असं म्हणत रुपाली पाटील यांनी कराडकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता.

 बंडातात्या कराडकर यांची जाहीर माफी

दरम्यान, कराडकर यांनी त्यांनी सुप्रिया सुळे तसेच पंकजा मुंडे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. या महिलांबद्दल मला कोणताही वैयक्तिक आकस नाही. माझ्याकडून ते वक्तव्य अनावधानाने निघाले. मी त्याबद्दल माफी मागतो. तसेच कोणाच्या भावना दुखावल्या तर दिलगिरी व्यक्त करतो, असे बंडातात्या कराडकर म्हणाले आहेत.

इतर बातम्या :

Bandatatya Karadkar | महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य, राज्यभरात गोंधळ ते माफी; वाचा बंडातात्या कराडकर चर्चेत का आले ?

धक्कादायक| आंदोलन सुरु असतानाच महिलेची डिलिव्हरी! अजूनही ठिय्या सुरुच, बीड जिल्हाधिकारी कार्यलयासमोरचा प्रकार!

बंडातात्या कराडकर यांच्या मठात पोलीस!! सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्याची चौकशी सुरु

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.